हिवाळा हा ऋतु आरोग्यास पोषक असल्यानं व्यवसाय सुरु करताना या कालावधीत केल्यास फायद्याचे ठरते. शेळ्यांची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो हिवाळ्यात सुरू करावा कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. शेळ्या, मेंढ्यांना पुरेसा आहार द्यावा. आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे.
हेही पाहा- शेळीपालनासाठी निवडा योग्य पद्धत
कोणत्याही व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापन याला फार महत्त्व आहे. शेळ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहिती असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येते. हिवाळा हा ऋतू प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेळीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो तो हिवाळ्यात सुरू करावा.
शेळ्यांच्या गोठ्याची रचना-
कोणत्याही भौगोलिक भागात व्यवसाय सुरु करण्याआधी तेथील स्थानिक जातींना प्राधान्यक्रम द्यावे. नव्याने निर्मिती झालेल्या जाती वातावरणाशी समरस होण्याची शक्यता कमी असल्याने, त्या वारंवार आजाराला बळी पडतात. परिणामी या शेळ्यांच्या आहारावर, ओषध-उपचारांवर जास्त खर्च होतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन शेळी पैदास धोरण ठरविताना स्थानिक शेळ्यांच्या जातीला प्रथम प्राधान्य द्यावं.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.