मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअम महत्त्वाचे कार्य बजावते. परंतु याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये प्रजननासंबंधी समस्या उद्भवतात, दूध उत्पादन कमी होते, दुग्धज्वर आजार होतो, वाढ खुंटते, जखमा लवकर भारत नाहीत, जनावरे अशक्त दिसू लागतात. हे लक्षात घेऊन जनावरांच्या दैनंदिन आहारात शिफारशीनुसार कॅल्शिअमचा समावेश करावा. जनावरांच्या शरीर बांधणीसाठी अत्यंत आवश्यक असलेला क्षारमिश्रण घटक म्हणजे कॅल्शिअम. जनावरांच्या शरीरात १.३३ टक्के कॅल्शिअमचे प्रमाण असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हे हाडे आणि दातांमध्ये आणि तर राहिलेले १ टक्के कॅल्शिअम हे रक्त आणि इतर पेशींमध्ये साठलेले असते. आरोग्य व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेले कॅल्शिअम जनावरांच्या शरीरात आम्ल-अल्कली यांचे संतुलन त्याचप्रमाणे पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते. हिरवा चारा (द्विदल चारापिके), फिश ऑइल, कॉडलिव्हर ऑइल, तेलविरहित पेंडी इ. हे कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहेत. मांसपेशी आणि मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअम मोलाचे कार्य बजावते. परंतु याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये प्रजननासंबंधी समस्या उद्भवतात, दूध उत्पादन कमी होते, दुग्धज्वर आजार होतो, वाढ खुंटते, जखमा लवकर भारत नाहीत, जनावरे अशक्त दिसू लागतात. त्यामुळे जनावरांच्या दैनंदिन आहारात कॅल्शिअमचा समावेश असणे गरजेचे असते. अन्यथा, कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्यांना सामोर जावे लागते. हे टाळण्यासाठी जनावरांचा आहार कॅल्शिअमसारख्या क्षारमिश्रणाने परिपूर्ण असावा.
जनावरांच्या रक्तातील प्रमाण कॅल्शिअम ः ८ ते १२ मि.ग्रॅ./१०० मि.लि. फॉस्फरस ः ४ ते ६ मि.ग्रॅ./१०० मि.लि. मॅग्नेशिअम ः १ ते ३ मि.ग्रॅ./१०० मि.लि.
कॅल्शिअमचे कार्ये
कॅल्शिअम कमतरतेची लक्षणे
कारणे
कॅल्शिअमचे शोषण कमी प्रमाणात होणे
कॅल्शिअमची वाढती गरज
उपाययोजना
आहारातील अतिप्रमाणातील कॅल्शिअमचे दुष्परिणाम
कॅल्शिअमचे दुष्परिणाम टाळण्यासाठी
संपर्क ः अजय गवळी,८००७४४१७०२ (लेखक पशुसंवर्धन विषयातील तज्ज्ञ आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.