Embryo transplantation system for hereditary breeding is important
Embryo transplantation system for hereditary breeding is important

जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण प्रणाली

साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच वासराला जन्म देऊ शकते, परंतु सुपरव्यूलेशन प्रणालीचा वापर करून हेच प्रमाण ३ ते ४ प्रति वर्ष केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या वापराने गोठ्यात उच्च गुणवत्तेच्या दुधाळ गाईंचे संवर्धन शक्य आहे.

साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच वासराला जन्म देऊ शकते, परंतु सुपरव्यूलेशन प्रणालीचा वापर करून हेच प्रमाण ३ ते ४ प्रति वर्ष केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या वापराने गोठ्यात उच्च गुणवत्तेच्या दुधाळ गाईंचे संवर्धन शक्य आहे. दुधाळू जनावर पुनरुत्पादक आयुष्यामध्ये ५ ते ६ वेळा प्रजनन निर्मिती करू शकते. परंतु नवीन प्रणालीमुळे त्यामध्ये चांगली वाढ केली जाऊ शकते. गर्भ हस्तांतरण हे महत्त्वपूर्ण पुनरुत्पादक जैव तंत्रज्ञान आहे. जिथे नर व मादी अनुवांशिक घटकांचा उपयोग पशुधन सुधारण्यासाठी केला जातो. मल्टिपल ओव्हुलेशन (एकाधिक बीजकोश फुटून जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर (गर्भ हस्तांतरण) तंत्रज्ञानाचा वापर करून मुक्त केंद्रक प्रजनन प्रणाली (Open Nucleus Breeding System) तयार केली जाते. या प्रणालीमध्ये नर व मादी यांचे उच्चवर्गीय कळप तयार केले जातात. कळपातील निवडक वळूंमध्ये काटेकोर निवड चाचणी करणे आवश्यक असते. लहान वयामध्ये वंशावळ माहितीचा आधार घेऊन उच्च मादी किंवा वळूची चाचणी करणे आवश्यक आहे. पारंपरिक वंश चाचणी कार्यक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ओएनबीएसअंतर्गत अनुवांशिक प्रतिसाद जास्त असू शकतो. एक कळप किंवा काही कळपांमध्ये निवड व चाचणी केल्याने अनुवांशिक बदलांच्या निर्धारकांवर अधिक प्रमाणात नियंत्रण ठेवणे (निवडीची तीव्रता, पिढी कालावधी आणि निवडीची अचूकता) शक्य ठरते. तांत्रिक प्रक्रिया

  • जिवंत शरीरात (In vivo) किंवा कृत्रिम गर्भधारणा (in vitro) करून भ्रूण उत्पादनानंतर त्याचे हस्तांतरण सरोगेट मादीमध्ये (recepient female) करतात आणि वासराचा जन्म निर्धारित केला जातो. हे सर्व वेगवेगळ्या परस्परावलंबी टप्प्यामध्ये काळजीपूर्वक केले जाते.
  • यात पाच आठवड्यांचा सुपर ओव्हुलेशन प्रणालीचा (एकाधिक उत्कृष्ट बीजकोश फुटून जनन पेशी बाहेर येण्याची क्रिया) समावेश आहे, ज्यामुळे नैसर्गिक माजाच्या वेळी एखाद्या दाता गायीकडून(Donar female) अनेक अंडी बाहेर पडतात. गर्भाशय स्थानांतरण करण्यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सचा वापर करतात. ज्यामुळे अंडाशयातून एका चक्रात एकापेक्षा जास्त अंडे बाहेर पडतात.
  • गाईमध्ये गर्भरोपण केले जाते. त्यानंतरच्या आठवड्यात गर्भ पिशवीतून गर्भ काढले जाते. यामध्ये गर्भाशय ग्रिव्हामधून गर्भाशयामध्ये कॅथेटर ठेवले जाते, जिथे गर्भाशयातून (uterine horn) भ्रूण गोळा करण्यासाठी कफ फुगविला जातो आणि द्रव आतून बाहेर काढला जातो. एका फ्लशमध्ये सरासरी पाच गर्भ तयार होतात.
  • हे गर्भ त्यांच्या इस्ट्रस सायकलमध्ये (estrus cycle ) एकाच टप्प्यावर असलेल्या, परंतु गाभण नसलेल्या सरोगेट गाईमध्ये गर्भरोपण केले जाते.
  • जातिवंत दुधाळू गाई ७५ ते ९० टक्के सुपर ओव्हुलेशन उपचारांना प्रतिसाद देतात, परंतु २० ते ३० टक्के गायींचे हस्तांतरणीय गुणवत्तेचे भ्रूण तयार होत नाहीत. एफएसएचफ उपचारांना यशस्वीरीत्या प्रतिसाद देणाऱ्या गायींमध्ये चांगल्या प्रतीचे गर्भ तयार करण्याचे प्रमाण खूप चांगले आहे (० ते> २० प्रति फ्लशपर्यंत). सर्वसाधारणपणे ३० ते ४० टक्के गर्भ हस्तांतर यशस्वी होते.
  • तंत्रज्ञानाचे फायदे

  • दुधाळू उच्च प्रतीच्या गाईंचा पुनरुत्पादक दर वाढतो.
  • शस्त्रक्रियाविना भ्रूण ताजे हस्तांतरित केले जाऊ शकतात किंवा प्रयोगशाळेमध्ये गोठविले जाऊ शकतात.
  • भविष्यातील उच्च प्रतीच्या गाईंचे संवर्धन शक्य.
  • संपर्क - डॉ. शिवाजी वाघ, ८६००४६७३७९ (पीएचडी स्कॉलर, पशू अनुवांशिकी विभाग, भारतीय पशू संशोधन संस्था, बरेली, उत्तर प्रदेश)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com