जनावरांमध्ये ज्वारी धाटांची विषबाधा

जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.ज्वारीचे पीक लहान अवस्थेत असताना जनावरांनी खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते.
कोवळी ज्वारी जनावरांच्या आहारात येणार नाही,याची काळजी घ्यावी.
कोवळी ज्वारी जनावरांच्या आहारात येणार नाही,याची काळजी घ्यावी.

जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.ज्वारीचे पीक लहान अवस्थेत असताना जनावरांनी खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते. जनावरांनी ज्वारीची कोवळी धाटे (पोंगे) खाल्ल्यास होणाऱ्या विषबाधेला किराळ लागणे असे म्हणतात. दरवर्षी रब्बी हंगामात जनावरांनी कोवळी पोंगे खाऊन ती दगावल्याच्या घटना घडतात. ज्वारीचे पीक लहान अवस्थेत असताना जनावरांनी खाल्ले तर त्यांना विषबाधा होऊ शकते, त्यामुळे पशुपालकांनी याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. विषबाधेची कारणे  ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते. लक्षणे 

  • ज्वारीचे कोळी पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा ताबडतोब मृत्यू होतो.
  •  कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होते. -श्वासोश्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात श्वसनाला त्रास होतो.
  •  जनावरे थरथर कापते व बेशुद्ध पडते, ह्रदय बंद पडल्याने शेवटी जनावर दगावते.
  • उपचार 

  • जनावराचे पोट फुगलेली असते, त्यामुळे सर्वप्रथम पोटातील हवा काढावी.
  • पशुवैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्याने गाई, म्हशींना सोडियम नायट्रेट ३ ग्रॅम सोडियम थायोसल्फेट १५ ग्रॅम २०० मिलि शुद्ध पाण्यात मिसळून शिरेद्वारे टोचावे.
  •  शेळी, मेंढयामध्ये ३ ग्रॅम सोडियम नायट्रेट, ५ ग्रॅम सोडिअम थायोसल्फेट ५० मि.लि शुद्ध पाण्यात मिसळून शिरेद्वारे टोचावे.
  •  शुद्ध पाण्यामध्ये इंजेक्शन निकेथेमाईड द्यावे. ही औषधे लागू न पडल्यास पुन्हा द्यावीत.
  • प्रतिबंधात्मक उपाय 

  •  जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
  • ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेले असेल तर असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांच्या खाद्यामध्ये द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
  • ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
  • कासदाहाकडे दुर्लक्ष नको... कासदाहाची बाधा झालेली गाय,म्हैस दूध काढू देत नाही, कारण त्यांच्या कासेला सूज आलेली असते.जनावरांची कास जीवजंतूच्या संसर्गाला अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे असंख्य प्रकारचे जिवाणू,विषाणू,बुरशी यांच्या प्रार्दुभावामुळे कासदाह होतो. दूध काढण्याची चुकीची पद्धत, दूध काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता, गोठ्यातील घाण, पशू खाद्यातील खनिज द्रव्यांची कमतरता,या गोष्टी कासदाह होण्यासाठी कारणीभूत ठरतात. दुष्परिणाम 

  • योग्य उपचार न झाल्यास कास कायमची निकामी होते.
  • दूध उत्पादनामध्ये घट होते.
  • कासदाह बाधित जनावरांच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते.
  • तीव्र स्वरूपातील कासदाह हा लक्षणावरून सहजपणे ओळखता येतो. सुप्त अवस्थेतील कासदाह या प्रकारामध्ये कुठलीच दृश्य लक्षणे दिसत नसल्यामुळे त्याचे निदान हे फक्त प्रयोगशाळांमध्ये करता येते. यासाठी प्रयोगशाळेत खालील प्रकारच्या चाचण्या कासदाह निदानासाठी महत्त्वाच्या असतात. सी.एम.टी. चाचणी  सुप्त / सौम्य स्वरूपातील कासदाहामध्ये दुधातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते व दूध आम्लारीधर्मी होते.याची चाचणी करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची प्लास्टिक प्लेट वापरली जाते. या प्रत्येक कपामध्ये प्रत्येक सडातील दोन मिलि दूध घ्यावे. त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात सी.एम.टी. द्रावण मिसळावे. ते कप हलवून दूध व द्रावण मिसळावे. जर त्यामध्ये गुठळ्या आढळल्यास तो सुप्त प्रकारचा कासदाह असल्याचे समजावे . तसेच यासोबत प्रयोगशाळेतील इतर चाचण्या कराव्यात उदा. पेशींची संख्या मोजणे, रोग जतूंची तपासणी कारणे. उपचार पद्धती

  • कासदाहाला कारणीभूत रोग जतूंची प्रतीजैविकाला असलेली संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रतीजैविकांची निवड करावी.
  • प्रतीजैविकांची योग्य मात्रा स्नायू आणि शिरेतून द्यावी. काही मात्रा ही सडातूनच द्यावी.
  • सडातून औषधे देताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.
  • संपर्क : डॉ.बी.सी.घुमरे, ९४२१९८४६८१ डॉ.विकास कारंडे, ९४२००८०३२३ (पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता.खंडाळा,जि.सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com