तुती, रेशीम कीटकांचे व्यवस्थापन तंत्र

प्रौढ रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम किटकास वाढीच्या अवस्थेत मिळणारी जागा आणि तुती पानांची प्रत महत्त्वाची असते.योग्य व्यवस्थापनासाठी पक्या स्वरूपात सिमेंट कॉंक्रीट किंवा भिंती उभारून शाश्वत संगोपनगृह बांधावे.
Proper management of silkworm rearing should be maintained.
Proper management of silkworm rearing should be maintained.

प्रौढ रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम किटकास वाढीच्या अवस्थेत मिळणारी जागा आणि तुती पानांची प्रत महत्त्वाची असते.योग्य व्यवस्थापनासाठी पक्या स्वरूपात सिमेंट कॉंक्रीट किंवा भिंती उभारून शाश्वत संगोपनगृह बांधावे. यशस्वी रेशीम कोष उत्पादनामध्ये तुती पानांची प्रत ३८ टक्के आणि संगोपनगृहातील तापमान आणि आद्रतेचा ३७ टक्के वाटा असतो. हिवाळ्यामध्ये दिवस आणि रात्रीचे तापमान आणि आद्रतेमध्ये तफावत आढळते. संगोपनगृहातील तापमान ३० अंश सेल्सिअस आणि आद्रता ८० टक्यांच्यावर जाता कामा नये. कच्या शेडनेट किटक संगोपनगृहात हिवाळयात कोळश्याच्या शेगडीने किंवा रूम हिटरच्या साहाय्याने तापमान वाढवता येते. परंतु योग्य व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी पक्या स्वरूपात सिमेंट कॉंक्रीट किंवा भिंती उभारून शाश्वत संगोपनगृह बांधावे. दुबार रेशीम कोष उत्पादनासाठी आवश्यक बाबी  तुती छाटणी 

  • चांगल्या सिकेटरच्या साहाय्याने जून आणि नोव्हेंबर महिन्यात एका ठिकाणी एक झाड याप्रमाणे तुती छाटणी जमिनीपासून १.५ ते २.० फूट अंतरावर करणे आवश्यक आहे.
  • परिपक्व तुती पानांचे उत्पादन मिळण्यासाठी ३ ते ५ फुटव्यांची वाढ होते. पानाचे चांगले दर्जेदार उत्पादन मिळते. दुसऱ्या वर्षापासून पुढे एकरी वर्षाला २५ टन तुती पानाचे उत्पादन मिळते. व्ही-१ तुती जातीपासून ६५ टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
  • संगोपनगृह आकार 

  • प्रौढ रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम किटकास वाढीच्या अवस्थेत मिळणारी जागा आणि तुती पानांची प्रत महत्त्वाची असते. चौथ्या वाढीच्या अवस्थेनंतर एक वेळा रॅकवरील किटकांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या अवशेषांची स्वच्छता करावी. २) रेशीम कीटकांची उत्तम वाढ होण्यासाठी १०० अंडीपुंजासाठी रॅकवर १ हजार चौरस फूट चटईक्षेत्र आवश्यक असते.
  • बाल्य व प्रौढ किटक संगोपनगृह वेगवेगळे असावे.
  • उच्च प्रतीच्या दुबार रेशीम कोष उत्पादनासाठी एक एकर तुती बागेसाठी ८२ फूट लांब, २३ फूट रुंद आणि १५ फूट उंच आकाराचे संगोपनगृह असावे. जमिनीपासून २.५ ते ३ फूट उंच बेसमेंट बांधकाम केलेले संगोपनगृह असावे. जमिनीलगत चारही बाजू आणि वरील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी तिरपी वायू विजन व्यवस्था असावी. आवश्यक खिडकीच्या खालील व वरील बाजूस झरोके असावेत.
  • दुसऱ्या वर्षी बागेपासून ३ टन तुती पाने मिळतात. त्यामुळे शेतकरी ३०० अंडीपुंज घेवू शकतात.
  • अंडिपुंजाएवजी बाल्य किटक संगोपनासाठी घेतले तर दरवर्षी कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ९ ते १० कोषाची पिके शेतकरी घेवू शकतो. त्यासाठी संगोपनगृहात वेगळे कोष विणनगृह आणि बाल्य किटक संगोपनगृह असावे. पाने साठवण्यासाठी लिफ चेंबर आणि अंधार खोलीची व्यवस्था असावी.
  • तुती पाने खाद्य साठवण 

  • एक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी तुती पाने साठवणगृह १२ x १३ फूट आकाराचे (अंधार खोली) असावे.
  • चारही बाजूने आतून पाणी बाहेर जाण्यासाठी २२ x १५ सें.मी. आकाराची नाली असावी.
  • पानावरील धुळ निघून जाण्यासाठी उभे करून ठेवलेल्या फांद्यावर पाणी फवारण्याची सोय असावी.
  • फांद्या धुतल्यानंतर एक तासानंतर रॅकवर आळ्यांना फांदी खाद्य द्यावे.
  • उझी माशी फांद्यावर बसून तुती बागेतून सरळ रेशीम कीटक संगोपनगृहात प्रवेश करते आणि अळीवर बसून त्वचेवर अंडी देते. उझी माशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फांद्या शेतातून कापणी करून संगोपनगृहात न साठवणे हा एक उपाय आहे
  • तुती लागवडीचे व्यवस्थापन 

  • तुती हे रेशीम किटकांचे एकमेव खाद्य असल्यामुळे यशस्वी कोष उत्पादन करण्यासाठी तुती पाने किंवा मुळावर कोणता रोग येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
  • वर्षाकाठी पाच कोषाची पिके घेतली (७० दिवसांच्या अंतराने) तरी जमीन आणि पानावर येणारे रोग वाढण्याची शक्यता असते. रोगामुळे २० टक्के रेशीम कोष पिकाचे नुकसान होते. तुती पानांची प्रत खालावते.
  • तापमान, आद्रता आणि पर्जन्यमानाचा परिणाम तुतीवरील रोग प्रादुर्भावास कारणीभूत ठरतो. रोगग्रस्त तुती पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यास रेशीम कीटकांची वाढ, कोषाची प्रत आणि उत्पादन तसेच रेशीम धाग्याच्या प्रतीवर परिणाम होतो. म्हणून वेळेवर जमिनीतून पानावर येणारे रोग आणि सूत्रकृमींचे नियंत्रण आवश्यक आहे.
  • रोपवाटिकेत रोगयुक्त बेणे लागवड केल्यास किंवा तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि ४० टक्यांपेक्षा कमी जमिनीतील आद्रता किंवा जमिनीचा सामू ५ ते १० दरम्यान असेल तर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
  • संपर्क ः डॉ. सी.बी.लटपटे ७५८८६१२६२२, ( रेशीम संशोधन योजना,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com