जनावरांमध्ये योग्य पद्धतीने जंतनिर्मूलन

जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. हे लक्षात घेऊन साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे.
Goats should be dewormed on schedule.
Goats should be dewormed on schedule.

जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. हे लक्षात घेऊन साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे. जनावरांमध्ये जंत (कृमी) प्रादुर्भाव झाल्यास विशेषतः पावसाळा, हिवाळा ऋतूमध्ये ठरावीक कालांतराने जंतनाशकाची मात्रा दिली जाते. विशेषतः शेळी-मेंढीमध्ये सातत्याने जंतनिर्मूलन करावे लागते. कारण त्यांच्यामध्ये नियमितपणे जंताचा प्रादुर्भाव होतो. साधारणपणे योग्य मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच जंतनिर्मूलन करावे. यामुळे शेळी-मेंढीचे परजीवीपासून संरक्षण होऊन उत्पादन, पुनरुत्पादन व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही कारणाने जेव्हा जंतनाशकाची ठरावीक मात्रा देऊनदेखील ५० टक्के कमी जंतांवर त्या औषधाचा परिणाम होत नाही, म्हणजेच ते कृमी त्या जंतनाशकाला प्रतिकारक्षम बनतात. ही प्रतिकारक्षमता पुढील पिढीमध्ये प्रसारित होते. म्हणून जनावरांमध्ये जंतनिर्मूलन केले असले, तरी त्यांचा प्रादुर्भाव जाणवतो. जंतामधील प्रतिकारशक्ती त्यांच्या जनुकीय पातळीवर होते. जंतांच्या पुढील पिढ्यादेखील औषधास दाद देत नाहीत. ही एक अत्यंत घातक प्रक्रिया आहे. जंताची प्रतिकारशक्ती वाढल्याने औषधीवरील खर्च वाया जातो. जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. शारीरिक ताण येतो. जंतनाशकाप्रती प्रतिकारक्षमता तयार होण्याची कारणे 

  • एकच प्रकारचे जंतनाशक अनेक वेळेस वापरणे. विशेषतः त्याच वर्गातील जंतनाशक सातत्याने वापरणे.
  • जंतनाशकाची मात्रा परजीवीचा प्रजाती, पशुवैद्यकांचे मार्गदर्शन व परजीवीची प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता लक्षात न घेता सातत्याने चुकीचे जंतनाशक वापरणे.
  • जंतनाशकाचा योग्य प्रमाणामध्ये मात्रा न देता कमी प्रमाण, जास्त प्रमाण, कित्येक पटीने गरजेपेक्षा जास्तीचा वापर, न लागू होणारे जंतनाशक वापरणे इत्यादी.
  • जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असूनदेखील जंतनाशकाचा वापर करणे.
  • जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असताना इतर पर्यायी बाबींचा विचार न करणे.
  • विशिष्ट जंताच्या प्रजातीस लागू न होणारे जंतनाशक वापरणे. या सर्व बाबींचा परिणाम प्रतिकार क्षमता वाढण्यामध्ये होतो. शेळी-मेंढीमध्ये हिमॉन्कस कॉन्टूरटस हे रक्तशोषण करणारे जंत अनेक जंतनाशकाच्या प्रती आजच्या मितीस प्रतिकार शक्ती वाढवून तयार झाले आहेत. म्हणून त्यांच्यावर बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक जंतनाशकांचा परिणाम दिसून येत नाही.
  • उपाययोजना आणि काळजी 

  • जंतनाशक देण्यापूर्वी विष्ठेचे नमुने ः साधारणपणे १०० शेळ्या-मेंढ्यांपैकी कमीत कमी ५ शेळ्या-मेंढ्यांची तपासणी करून जंताची लागण झाली आहे का? प्रजाती कुठली? कुठले जंतनाशक प्रभावी आहे. जंतनाशकाची मात्रा देणे, खरंच आवश्‍यक आहे का? जंतप्रादुर्भावाची तीव्रता पशुतज्ज्ञांकडून करून घ्यावी.
  • तज्ज्ञांनी सांगितलेली मात्रा न बदलता योग्य प्रमाणामध्ये (कमी किंवा जास्त नको) जंतनाशकाची मात्रा द्यावी.
  •  तीन ते चार वेळेसच्या जंतनिर्मूलानंतर जंतनाशकाचा वर्ग बदलून नवीन वर्गातील जंतनाशक वापरावे. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला आवश्‍यक आहे.
  • जंतनाशक देतेवेळेस शेळी-मेंढी गर्भवती आहे का? हे तपासावे. जंतनाशक गर्भास हानिकारक नसावे.
  • जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास नियंत्रणाचे पर्याय 

  • कुरणावर करावयाचे व्यवस्थापन आणि कुरणावर फिरत्या पद्धतीने जनावरास चारावे.
  • सकाळी दवबिंदू आहेत तोपर्यंत जनावरे आणि शेळी, मेंढीस
  • चरावयास सोडू नये.
  • कुरण व्यवस्थापनाच्या सर्व पद्धती एकत्रित वापराव्यात. व्यवस्थापनाद्वारे जंताचा प्रादुर्भाव व प्रसार कमीत कमी होईल. रासायनिक जंतनाशक देण्याची गरज भासणार नाही. याची दक्षता घ्यावी.
  • वनस्पतिजन्य जंतनाशके उपलब्ध झाल्यास आलटून-पालटून पद्धतीने रासायनिक जंतनाशकासोबत त्यांचाही वापर करावा.
  • कुरणामध्ये जंताच्या अर्भक अवस्था खूपच वाटल्यास त्यावर युरियाची हलकी मात्रा फवारल्यास चालते; परंतु यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्‍यक आहे. कारण युरियाची मात्रा वाढल्यास जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता असते.
  • कुरणातील गवतावर जंताची संख्या जास्त असल्यास ते गवत कापून वाळल्यानंतर जनावरांना खाण्यासाठी द्यावे.
  • संपर्क  डॉ. बाबासाहेब नरळदकर, ९४०३८४७७६४ डॉ. गजानन चिगुरे, ९७६१९६४९९९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com