मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठेवावे. मत्स्यबीजाची योग्य पद्धतीने निवड करावी. शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनाला संधी आहे.ज्याच्याकडे लहान आकाराचे शेततळे आहे, त्यामध्ये २ ते ४ महिन्यांच्या कालावधीमध्ये मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली संवर्धन हा व्यवसाय करता येतो. यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला मत्स्य जिरे खरेदी करणे गरजेचे आहे. मत्स्य बीज केंद्रात मत्स्य जिरे मिळते. मत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकली पर्यंतचा काळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण ते खूप लहान व नाजूक असतात. त्याच बरोबर पाणी आणि खाद्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाणी हे कूपनलिका किंवा तलावातून गाळून घेतले पाहिजे. त्यामुळे मासे आणि बेडूक शेततळ्यात येत नाहीत. खाद्य व्यवस्थापनात नैसर्गिक खाद्यनिर्मिती महत्त्वाची आहे, यासाठी शेततळ्यात शेणखत व रासायनिक खतांचा वापर गरजेचा आहे. हे सर्व झाल्यानंतर १५ दिवसांनी मत्स्य जिऱ्याचे संचयन करावे. मत्स्य बीज खरेदी ज्या भागामध्ये मत्स्य शेतकऱ्याची मागणी आहे त्या माशांचे बीज संचयन करावे. बहुतांश शेतकरी कटला, रोहू आणि मृगळ या भारतीय प्रमुख कार्प जातीचे मासे संवर्धन करतात. याचबरोबरीने विदेशी पंगस, तिलापिया आणि मरळ माशांचे संगोपन केले जाते. मत्स्यबीज खरेदी करताना चांगल्या व्यक्ती किंवा शासकीय मत्स्य विभागातून माहिती घ्यावी.
मत्स्य बीज अनुकूलन प्रक्रिया जेव्हा आपण मत्स्यबीज खरेदी करून आपल्या शेततळ्यावर देऊन येतो तेव्हा तिथल्या आणि आपल्या शेततळ्यातील वातावरणाशी अनुकूलता प्रक्रिया करणे खूप महत्त्वाची आहे. कारण तिथल्या आणि आपल्या वातावरणामध्ये खूप फरक असतो. यासाठी स्थिरपणे आपल्या तलावावर अनुकूलता प्रक्रिया करावी.
माशांचे बीज ओळखण्याची युक्ती कटला
रोहू
मृगळ बीज बीज पाण्याच्या भांड्यात ठेवले तर ते पाण्याच्या तळाशी पोहताना दिसते. - रामेश्वर भोसले, ९८३४७११९२० (भोसले हे मत्स्य महाविद्यालय व संशोधन संस्था, थुतुकुडी (तमिळनाडू) येथे संशोधक विद्यार्थी आहेत. वाघमारे हे अमरावती येथे सहायक मत्स्य विकास अधिकारी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.