टाळा जनावरांची विषबाधा...​

ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.
जनावरांच्या आहारात विषारी वनस्पती येणार नाहीत याची काळजी घ्यावी
जनावरांच्या आहारात विषारी वनस्पती येणार नाहीत याची काळजी घ्यावी

ज्वारीच्या कोवळ्या धाटांची विषबाधा जनावरांनी ज्वारीचे कोवळे धाटे (पोंगे) खाल्ल्यास होणाऱ्या विषबाधेला किराळ लागणे असे म्हणतात. कारणे 

  • ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.
  • लक्षणे 

  • जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
  • कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होते. -श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात.
  • श्वसनाला त्रास होतो, जनावरे थरथर कापते. बेशुद्ध पडते
  • उपचार 

  • जनावराचे पोट फुगलेली असते. पशुवैद्यकाच्या सल्याने तातडीने उपचार करावेत.
  • प्रतिबंधात्मक उपाय 

  •  जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
  • जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेले असेल तर असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांना खाण्यास द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.
  • ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.
  • झाडाझुडपांमुळे होणारी विषबाधा  आपल्या परिसरात कोणत्या प्रकारची विषारी झाडे झुडपे आहेत, त्याची विषबाधा कशाप्रकारे करता येईल, हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. पशूतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विषबाधेवर उपचार करावेत. जनावरे चरताना गवतासोबत विषारी झाडांचा पाला देखील खातात. विषबाधा होऊन जनावरे मृत्यू पावल्यामुळे आर्थिक नुकसान होते. विषारी झाडपाला खाल्ल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत नाही. परंतु विषारी घटकांचा अंश दूध, अंडी किंवा मांसामध्ये उतरतो. त्यामुळे मानवामध्ये विषबाधा होते. गाजर गवत  विषारी घटक : पारथेनिन लक्षणे

  • त्वचा रोग होतात. जनावरांच्या अंगाला खाज सुटते.
  • अंगावर फोड येऊन फुटतात. त्यामुळे जनावरांना जखमा होतात. अंगावरची कातडी तडकते. बाधित जनावरांच्या दुधाला कडवट चव येते.
  • उपचार

  • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचे इंजेक्शन तसेच लिव्हर टॉनिक द्यावे.
  • बाधित जनावरांना गोठ्यात सावलीत बांधून ठेवावे.
  • रुचकी  विषारी घटक: जिजाटिन, कॅलोट्राक्झीन. लक्षणे  जनावरांचा श्वास वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. हृदय बंद पडून जनावरांचा मृत्यू होतो. उपचार  पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. घाणेरी  विषारी घटक :  लॅन्टेडेन, एबीसी. लक्षणे 

  • जनावरांच्या यकृतामध्ये बिघाड झाल्यामुळे जनावरांना त्रास होतो. अंगावर खाज सुटते व जखमा होतात.
  • अंगावरील कातडी तडकते. पोटामध्ये बिघाड होऊन अपचन होते.
  • उपचार 

  • जनावरांना प्रत्यक्ष सूर्यप्रकाशापासून लांब ठेवावे.
  • जनावरांच्या अंगाला खाज असेल तर ॲलर्जी प्रतिबंध व प्रतिजैविक इंजेक्शन द्यावे. यकृताचे कार्य सुरळीत होण्यासाठी यकृत संरक्षण औषधे द्यावीत.
  • कण्हेर : लाल कण्हेर  विषारी घटक : नेरिओसाइड, ओजेड्रिन पिवळी कण्हेर  विषारी घटक :  धिवेटन लक्षणे 

  • जनावरांची भूक मंदावते. संडास लागते. पोटामध्ये वेदना होतात.
  • हृदयाचे ठोके कमी होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. जनावर मृत्यू पावते.
  • उपचार पोटातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उपयुक्त औषधी द्यावीत. बेशरम  विषारी घटक : अल्कलाईड व संपोलिन लक्षणे :

  • बेशरम खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा मोठया प्रमाणात होते. शेळ्या कोणत्याही प्रकारचे लक्षण न दाखवता मृत्यू पावतात.
  • मोठ्या जनावरांमध्ये लाळ गळते, संडास लागते. जनावरांना चालता येत नाही. रक्तदाब कमी झाल्यामुळे जनावरांचा मृत्यू होतो.
  • उपचार 

  • यासाठी विशिष्ट उपचार पद्धती उपलब्ध नाही. परंतु लक्षणावरुन उपाययोजना करावी. उपाययोजना करताना जनावरांना विषारी वनस्पतीपासून दूर ठेवावे.
  • पोट साफ करणारी औषधे द्यावीत. पोटातील विषारी द्रव्यांचे शरीरात होणारे शोषण टाळण्यासाठी कोळशाची भुकटी किंवा त्याचे द्रावण पाजावे.
  • धोत्रा : विषारी घटक : ॲट्रोपीन लक्षणे :

  • जनावरे सुस्त होतात. तोंड कोरडे पडते. जनावरांची भूक मंदावते डोळ्यांची बुब्बळे मोठी होतात. आंधळेपणा येतो.
  • श्वास घेण्यास त्रास होतो. शरीर थंड पडते. जनावर थरथर कापतात. जनावरांना चक्कर येऊन त्यांचा मृत्यू होतो.
  • उपचार :

  • लक्षणांवरुन उपचार करावेत. पोटातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उलटी व संडास होणारी औषधे द्यावीत.
  • सुरवातीला जनावर फिरते ठेवावे. जनावरांचे झटके कमी करण्यासाठी त्यांना शांत करणारी औषधे द्यावीत.
  • संपर्क : डॉ.बी.एन.आंबोरे,९४२१३८५४२९ डॉ.व्ही.व्ही.कारंडे, ९४२००८०३२३ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि.सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com