Radhika Mhetre
एकच पाणी देण शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे
पेरणीनंतर तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ दिवसांनी आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
गव्हाला जर एकच पाणी दिले, तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते.
दोन पाणी दिले, तर उत्पादनात २० टक्के घट येते. याशिवाय ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ४० ते ५० टक्के बचत होते.
ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर टँकमधून देता येतात. खतांच्या वापरामध्ये २५ ते ३० टक्के बचत करता येते.
पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठ्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते. दाणे चांगले भरले जातात. दाण्यांना वजन चांगले मिळते. दाण्याची गुणवत्ताही चांगली मिळते.