Fruit Market
Fruit Market Agrowon
यशोगाथा

वसमत तालुक्यात बहरतेय करवंद शेती

माणिक रासवे

हिंगोली : अन्य पिकांच्या तुलनेत कमी पाणी, कमी उत्पादन खर्चात (Less Input Cost) किफायतशीर उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वसमत तालुक्यातील शेतकरी करवंद लागवडीकडे (Karvand Farming) वळले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात तालुक्यात करवंद लागवड क्षेत्र दोनशे एकर पर्यंत विस्तारले आहे. शेतकरी गटांमार्फत थेट शेतातून करवंदांची विक्री केल्यामुळे फायदा होत आहे. तालुक्यामध्ये करवंदांची शेती बहरत आहे.

वसमत तालुक्यात दर एक दोन वर्षाआड दुष्काळाला सामोरे जावे लागते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. केळी, ऊस या पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. या परिस्थितीत शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांचा पर्याय शोधत आहेत. गेल्या दहा वर्षात पारंपारिक हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. परंतु, गेल्या काही वर्षात वाढलेला उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता, कमी बाजारभाव आदी कारणांमुळे हळद हे पीक देखील परवडत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

वसमत तालुक्यातील लिंगी येथील बालाजी यशवंते, कुरुंदा येथील सदाशिव गवळी, वसमत येथील संजय लोंढे आदींसह अनुभवी, प्रयोगशील शेतकरी एकत्र आले. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या फळपिक लागवडीसाठी अभ्यास सुरु केला. आंबा, फणस, सीताफळ आदी फळपिकाच्या लागवडीची चाचपणी केली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना करवंद लागवडीबाबत माहिती मिळाली. करवंद बाजारपेठाचा अभ्यास केला. २०१६ मध्ये तालुक्यातील अनेक गावात करवंद लागवड सुरु झाली. आजवर वसमत, पांगरा सती, लिंगी, हयातनगर, कुरुंदा, जवळा बुद्रक, आसेगाव, हिरडगाव, खंदारबन, इंजनगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी करवंद लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे करवंद उत्पादन सुरु झाले आहे.

‘आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांना गटाने एकत्र येऊन शेती करावी लागणार आहे. बाजारपेठाचा अभ्यास करून तेरा एकरवर करवंद आणि त्यामध्ये सीताफळाची लागवड केली आहे. अन्य पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. परंतु काटेकोर पीक व्यवस्थापन करावे लागते. गटाव्दारे विक्रीमुळे फायदा होत आहे,’’
बालाजी यशवंते, शेतकरी, लिंगी, ता. वसमत
‘‘गुलाबी करवंदांना उत्तर भारतातील व्यापाऱ्याकडून मागणी असते. गतवर्षी सुरवातीला लागवड केलेल्या अर्ध्या एकरात करवंदांचे २ टन उत्पादन तर प्रतिकिलो ४० रुपये दर मिळाले. सध्या चार एकरवर करवंद लागवड आहे. आणखीन सात एकरावर करवंद लागवड करणार आहोत,’’
सदाशिव गवळी, कुरुंदा, ता. वसमत
‘‘करवंदाच्या गुलाबी पांढऱ्या वाणाची स्वतः रोपे तयार करून दोन एकर मध्ये लागवड केली. दोन ओळीमध्ये पेरू लागवड केली. गतवर्षी करवंदांचे ५ टन उत्पादन मिळाले. प्रतिकिलो सरासरी ३८ ते ८० रुपये दर मिळाले. दिल्लीसह उत्तर भारत तसेच अकोला आदी ठिकाणचे व्यापारी करवंद खरेदी करतात, शेतकरी गटामध्ये चर्चेव्दारे दर निश्चित करून व्यापाऱ्यांना करवंदांची विक्री केली जाते.’’
सदाशिव अडकिणे, इंजनगाव, ता. वसमत

‘करवंदाचे चांगले उत्पन्न’

तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड म्हणाले, की कमी खर्चात चांगले उत्पादन, उत्पन्न मिळत आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल करवंद लागवडीकडे आहे. अनेक शेतकऱ्यांनी करवंद रोपवाटिका सुरु केल्या आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करवंद लागवडीस मान्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT