Samadhan Kamble Agrowon
यशोगाथा

Education Scholarship : शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली १ कोटीची शिष्यवृत्ती

समाधान आणि त्यांचे आई वडील आणि पाच बहिणी असे त्याचे कुटुंब आहे. विदर्भासारख्या भागातून पुण्यात येऊन समाधानने अभ्यास करून यश मिळवले आहे.

टीम ॲग्रोवन

वाशिम: विदर्भातील शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या समाधान कांबळे (Samadhan Kamble) या तरुणाने विदेशातील १ कोटीची शिष्यवृत्ती (Education Scolarship) मिळावली. वाशिम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे येथील शेतकरी कुटुंबातला समाधान हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. उच्च शिक्षण घेण्यासाठी तो आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

समाधान आणि त्यांचे आई वडील आणि पाच बहिणी असे त्याचे कुटुंब आहे. विदर्भासारख्या भागातून पुण्यात येऊन समाधानने अभ्यास करून यश मिळवले आहे.

समाधानचे आई-वडील शेतात मजूरी करतात. मजुरीच्या पैशातून त्यांनी समाधानला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. पुण्यातील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमधून त्याने सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केले. इंजिनियरिंगमध्ये त्याने द्वितीय क्रमांक पटकवला. समाधानच्या घरची परिस्थिती हालखीची होती.

उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. त्यासाठी भारत सरकारने समाधान कांबळेला १ कोटीची शिष्यवृत्ती दिली. मास्टर ऑफ सिविल इंजिनियरिंगसाठी त्याला मेलबर्न विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. मेलबर्न विद्यापीठ ऑस्ट्रेलियातील नामांकित विद्यापीठ आहे. जगात मेलबर्न विद्यापीठाचा ३६ वा क्रमांक लागतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT