Food Processing Agrowon
यशोगाथा

Food Processing : प्रक्रिया उद्योगातून तयार केला ब्रॅण्ड

उमरदरी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील डॉ. सत्यभामा जाधव यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत शेतीमाल प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध चवीच्या चटण्या, लोणचे (Pickle) पापड निर्मितीमध्ये त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा सर्व शेतीमाल त्या सेंद्रिय उत्पादक (Organic Produce) शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी करतात.

कृष्णा जोमेगावकर

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका हा कोरडवाहू शेती (Dry LAnd Agriculture) असलेला भाग. या तालुक्यात उमरदरी गाव हे मुखेड शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. या गावातील डॉ. सत्यभामा जाधव (Dr. Satybhama Jadhav) यांचे शिक्षण एम.ए.बी.एड., एमफिल. पी. एचडी. (समाजशास्त्र) या विषयात झाले आहे. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात त्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांचे स्वप्न वरिष्ठ प्राध्यापक व्हायचे होते, परंतु नोकरभरती बंदीमुळे त्यांनी तासिका तत्त्वावर काम करून संसाराला हातभार लावला. डॉ. जाधव यांचे माहेर शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे पहिल्यापासून शेती आणि शेती प्रक्रियेमध्ये (Agriculture Processing) त्यांना आवड होती.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका हा कोरडवाहू शेती असलेला भाग. या तालुक्यात उमरदरी गाव हे मुखेड शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. या गावातील डॉ. सत्यभामा जाधव यांचे शिक्षण एम.ए.बी.एड., एमफिल. पी. एचडी. (समाजशास्त्र) या विषयात झाले आहे. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात त्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांचे स्वप्न वरिष्ठ प्राध्यापक व्हायचे होते, परंतु नोकरभरती बंदीमुळे त्यांनी तासिका तत्त्वावर काम करून संसाराला हातभार लावला. डॉ. जाधव यांचे माहेर शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे पहिल्यापासून शेती आणि शेती प्रक्रियेमध्ये त्यांना आवड होती.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात ः

डॉ. सत्यभामा जाधव यांनी मसाला उद्योगामध्ये पहिल्यांदा पंधरा हजार रुपयांची गुंतवणूक केली. गाव परिसरातील बाजारपेठ लक्षात घेऊन सेंद्रिय मसाला लोणचे, पापड, विविध चटण्या, चकली पीठ, लाडूनिर्मितीला घरगुती स्तरावर सुरुवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने उत्पादने वाढविण्यास सुरुवात केली. या उत्पादनांच्या निर्मितीसाठी कच्चा शेतीमाल त्या सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. हळद, डाळी, पालेभाज्यांच्या उपलब्धतेसाठी त्यांच्यासोबत दहा शेतकरी जोडले गेले आहेत. शेतकरी आणि त्यांना परवडेल असा कच्चामालाचा दर ठरवून खरेदी केली जाते. यामुळे त्यांना वर्षभर योग्य गुणवत्तेचा कच्चा माल उपलब्ध होतो. तसेच या शेतकऱ्यांना देखील खात्रीची बाजारपेठ तयार झाली. प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठेत वेगळी ओळख तयार होण्यासाठी त्यांनी बळीराजा हा ब्रॅण्ड तयार केला.

प्रक्रिया उत्पादनांना सुरुवात झाली, परंतु त्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन लागले. परंतु न खचता डॉ. सत्यभामा जाधव यांनी ऑनलाइन अध्यापन सुरू ठेऊन उर्वरित वेळात प्रक्रिया उद्योगाच्या रेसिपी शिकण्यास सुरुवात केली. यामध्ये मसाला निर्मिती, पापड, बाकरवडी, आइस्क्रीम निर्मितीमध्ये कौशल्य प्राप्त केले. चुका आणि त्रुटी यातूनच त्यांनी उत्पादनांची गुणवत्ता गाठली. आई, आजीकडून त्यांना प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांनी प्रक्रिया उत्पादनांची संख्या वाढवत नेली. उत्पादनांचा दर्जा आणि चवीमुळे ग्राहकांकडून मागणी वाढू लागल्याने अर्थकारणदेखील सुधारले.

विविध शहरांत उत्पादनांची विक्री ः

डॉ. सत्यभामा जाधव या स्वतः बाजारपेठेच्या मागणीनुसार पदार्थ निर्मिती करतात. पती सतीशकुमार जाधव हे उत्पादनांची विक्री, आर्थिक व्यवहार, संपर्क, जाहिरात या जबाबदाऱ्या सांभाळतात. सध्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून लिंबू, आंबा, आवळा, मिरची, टोमॅटो, आंबे हळद लोणचे तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार नाचणी, तांदूळ, उडीद, मूग पापडनिर्मिती केली जाते. हंगामानुसार गव्हाच्या कुरड्या, बाजरीच्या खारोड्या, साबुदाण्याच्या चकल्या, लाडूमध्ये शुद्ध गावरान तुपातील डिंक लाडू, शेंगदाणा लाडू बनवले जातात.

त्याचबरोबर काळा मसाला, लाल तिखट, हळद पावडर आणि चटण्यामध्ये शेंगदाणा, लसूण, जवस, खोबरे, कारळे, तीळ चटणीचे उत्पादन केले जाते. विशेषतः लसूण चटणी आणि चकली पिठास चांगली मागणी आहे. चकली पिठाचे वैशिष्ट्ये म्हणजे भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून केवळ तिखट आणि मीठ मिसळून चकली तयार करता येते. नोकरी सांभाळून दरमहा प्रक्रिया उद्योगातून पंधरा हजारांचा नफा त्यांना मिळतो. येत्या काळात प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी त्यांचा प्रयत्न आहे.

विविध उत्पादनांना नांदेड जिल्हा तसेच मुंबई, औरंगाबाद शहरांतूनही चांगली मागणी आहे. ऑनलाइन जाहिरातींमधून त्यांनी विविध शहरातील ग्राहक मिळवले आहेत. त्याचबरोबर विविध शहरांतील धान्य महोत्सव, कृषी प्रदर्शन, रानभाजी महोत्सव तसेच शेतकरी ते ग्राहक बाजार या माध्यमातून त्यांनी प्रक्रिया उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळविली. यामुळे विविध जिल्ह्यांतील ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. सत्यभामा जाधव, ९४०३७४४७१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT