कदम कुटूंबियांनी फुलवलेली स्ट्राॅबेरी
कदम कुटूंबियांनी फुलवलेली स्ट्राॅबेरी  
यशोगाथा

नांदेड जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग, स्ट्रॉबेरीपासून आरोग्यवर्धक टॅबलेटसही 

माणिक रासवे

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव येथील कदम कुटुंबीयांनी एक एकरांत स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. त्याला बाजारपेठ मिळवलीच. शिवाय स्ट्रॉबेरीतील फिसॅटीन हा अँटीऑक्‍सिडंट हा घटक वेगळा करून त्याच्या टॅब्लेटस तसेच १४ प्रकारची उत्पादने तयार केली आहेत. मराठवाड्यातील हवामानात गोड, वजनदार स्ट्रॉबेरी पिकविण्याचा हा प्रयोग या भागासाठी निश्‍चित क्रांतिकारी ठरणारा आहे.    लिंबगाव ( ता. जि. नांदेड) येथील उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी रंगनाथराव परशराम कदम यांची शिवारात दोन ठिकाणी मिळून २० एकर हलकी ते मध्यम जमीन आहे. त्यांना कृष्णा आणि डाॅ. कन्हैया दोन मुले आहेत. रंगनाथराव यांचे शिक्षण बी.ए.एलएलबी.पर्यंत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास दौरा करून तेथील शेतकऱ्यांची पीक पद्धती त्यांनी अभ्यासली. त्यानंतर ते फळबागा केंद्रित शेतीकडे वळले.  पीक पद्धती 

  • मोसंबी ९००, डाळिंब ४००, आवळा-३००, चिकू १५०, संत्रा २००, आंबा ३० 
  • शेवगा बियाणे विक्रीसाठी ३०० झाडे 
  • सिंचनासाठी एक विहीर, बोअर, शेततळे, ठिबक 
  • प्रकिया उद्योगातून मूल्यवर्धन  कृष्णा यांचे शिक्षण बी.काॅम.एमएसडब्ल्यू पर्यंत झाले आहे. बियाणे कंपनीत नोकरी करताना प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी होत शेतीत नेमके काय करायचे याची दिशा स्पष्ट होत गेली. त्या वेळी मोसंबीला चांगले दर मिळत नव्हते. मग कृष्णा फळप्रक्रिया उद्योगात उतरले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयामधून फळप्रक्रिया उद्योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. श्रीकृष्णा ज्यूस व हर्बल इंडस्ट्रीजची स्थापना केली.  आजचा उद्योग 

  • आवळ्यापासून कॅन्डी, पावडर, मुरब्बा, कोरफडीपासून ज्यूस, पावडर, जेल, डाळिंबापासून ज्यूस 
  • करवंद, अननस विकत घेऊन त्यापासून उत्पादने 
  • कृष्णा ब्रॅण्डने बाॅटल आणि पाऊच पॅकिंगद्वारे विविध कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळाव्यांमधून विक्री - त्यासाठी स्वतःच्या वाहनाची सुविधा 
  • फळप्रक्रिया उद्योगाचा विस्तार  कदम कुटुंबीयांचा फळप्रक्रिया उद्योगात चांगला जम बसला आहे. माफक यंत्रसामग्रीवर सुरू केलेल्या उद्योगाचा काही वर्षांत विस्तार केला. रिॲक्टर, पेसकटर, ज्यूसर, पल्पर, ग्रॅन्युनर, कलर कोटिंग, स्प्रे डायर, टॅबलेट प्रेसिंग मशिन, बाॅटल, पाऊच पॅंकिग आदी यंत्रसामग्री घेतली. त्यातून वेळ, श्रमात बचत झाली. उत्पादनांचा दर्जा सुधारला. दहा व्यक्तींना रोजगार मिळाला.  स्ट्रॅाबेरीचा प्रयोग  रंगनाथराव यांचा मुलगा डाॅ. कन्हैया यांनी बीएएमएस (आयुर्वेदाचार्य), एम.एस्सी. (हर्बल मेडिसीन), एम.एस्सी.(मेडीसीनल प्लॅन्ट), पी.एचडी (हर्बल मेडीसिन), योग शिक्षक पदविका, एलएल.बी.आदी पदव्या संपादन केल्या आहेत. लिंबगाव येथील शेतात आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. शेतातील आघाडा, पुर्ननवा, गुळवेळ, कोरफड, आवळा आदींपासून औषधनिर्मिती ते करतात.  स्ट्रॉबेरीचे देखील आयुर्वेदात महत्त्व आहे. त्यामुळे घरी एका झाडाची लागवड करून पाहिली. ती यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेतून स्वीट चार्ली, विंटर डाऊन, विंटर स्टार, एलियाना, नॅबिला या वाणांची रोपे मागवली. महाबळेश्‍वर येथे ती वाढवली. एक महिना वयाच्या झाडांची पुनर्लागवड केली.  स्ट्रॉबेरीचे नियोजन 

  • सन २०१८, ऑगस्टमध्ये पाॅलिहाउस व खुल्या शेतात प्रत्येकी २० गुंठ्यांत रोपांची लागवड 
  • दोन्ही ठिकाणी प्रत्येकी चार फुटावर प्रत्येकी दीड फूट रुंदीचा गादीवाफा 
  •  त्यावर इनलाइन ठिबक व मल्चिंग 
  • तत्पूर्वी लेंडी खताची मात्रा. त्यानंतर प्रत्येक दहा दिवसांनी जीवामृताची फवारणी केली. 
  • किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्कासह कडूनिंबाची फवारणी केली. 
  • मराठवाड्यातील तापमानातही फुलली स्ट्राॅबेरी रंगनाथराव व डाॅ. कन्हैया म्हणाले 

  • फुलोऱ्यात असताना तापमान ३० अंश व त्यापुढे जाऊ लागले होते. पण, स्ट्रॉबेरी चांगली फुलली. आमच्या भागातील हवामान त्यास चांगले मानवले आहे. फळांची गोडी, आकार देखील महाबळेश्वरप्रमाणेच आहे. 
  • जमिनीतील वाफसा तसेच झाडांची गरज ओळखून पाणी द्यावे लागते. 
  • तीनवेळा फुलधारणा होते. जमीन मध्यम प्रकारची लागते. 
  • सध्या मात्र ४० अंशाच्या पुढील तापमानाचा वाढीवर परिणाम झाला आहे. परंतु, तोपर्यंत बरेच उत्पादन हाती आले आहे. 
  • एकूण २२ हजार रोपांपैकी ३५० रोपांची मरतूक 
  • विक्री 

  • खुले शेत व पॉलिहाउस मिळून एकूण ११ अकरा क्विंटल विक्री 
  • आठ बॉक्सचा एक ट्रे- त्याची विक्री २०० रुपये दराने 
  • जागेवरच ५० किलो विक्री 
  • टॅबलेट्सची निर्मिती  डाॅ. कन्हैया यांनी स्ट्रॉबेरीतील फिसॅटीन हा आरोग्यदायी घटक (अँटीऑक्‍सिडंट) वेगळा करून त्याच्या टॅबलेटस तयार केल्या आहेत. कर्करोगविरोधी गुणधर्म त्यात आहेत. त्याच्या विक्रीसाठी फूड सेफ्टी विषयातील सरकारी संस्थेचे प्रमाणीकरण घेतले आहे. सहाशे मिलिग्रॅमच्या सात टॅब्लेट पॅकिंगची किंमत ३०० रुपये आहे.  अन्य उत्पादने  फिसॅटीन या घटकाआधारे साबण, चहा आदी १४ प्रकारची उत्पादनेही डाॅ. कन्हैया यांनी बनवली आहे. त्यावर संशोधन अद्याप सुरू आहे.  पुरस्कार  रंगनाथरावांना उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार यांसह जिल्हास्तरीय, विद्यापीठ तसेच संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.  संपर्क..  रंगनाथराव कदम-९८२२६३८७३५  डाॅ. कन्हैय्या कदम-९४२०२६१०८०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT