राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कणगर व चिंचविहीरे या गावांत ‘शेतकरी प्रथम’ हा देशपातळीवरील प्रकल्प राबवला जात आहे. एकात्मिक शेती पध्दतीने तृणधान्य, कडधान्य, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान, पूरक, प्रक्रिया व्यवसायांबाबत मार्गदर्शनाबरोबर प्रात्यक्षिक करण्यात येत आहेत. त्यातून पीक उत्पादनात वाढ होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे देशभरातील राज्यांत ५२ केंद्रांमध्ये ‘शेतकरी प्रथम’ (फार्मर फर्स्ट) हा प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रात राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे त्या अंतर्गत एकमेव केंद्र आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शेतीतील उपक्रम, उपलब्ध साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी सक्षम करण्यासाठीची प्रात्यक्षिके त्या अंतर्गत राबविण्यात येत आहेत. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाद्वारे साडेसातशे शेतकरी सक्षम झाले आहेत. प्रकल्पाची कार्यपध्दती
अन्य तंत्रज्ञान
शेततळ्यातील मत्स्यपालन चिंचविहिरे आणि कणगर गावांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानअंतर्गत सुमारे १२५ शेततळी आहेत. गेल्यावर्षी चाळीस शेतकऱ्यांनी शेततळ्यात रोहू आणि सायप्रनस या माशांची ६००० मत्स्यबीजे सोडली. अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर माशांची वाढ पुरेशी झाली आहे. प्रत्येक शेततळ्यात किमान पाचशे किलो मासे विक्रीतून सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचे तर दोन्ही गावांत मिळून काही लाख रुपये उत्पन्न मिळेल. परसबागेतील कुक्कुटपालन दोन्ही गावांत भूमिहिन मजूर, महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी परसबागेतील कुक्कुटपालन उपक्रम राबविण्यात आला. त्यांना ५० ग्रामप्रिया जातीची पिल्ले देण्यात आली. हे पक्षी वर्षभरात १८० अंडी उत्पादित करतात. त्यातून प्रतिकुटुंबाला चांगल्या उत्पन्नाची हमी तयार झाली. ठळक बाबी
शेतकरी म्हणतात.... गावातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. डाळिंब, शेळीपालन, दुग्धव्यवसाय वाढीसाठी फायदा झाला. भास्कर वरघुडे, कणगर संपर्क- ९०११६३७०६४ परसबागेतील कुक्कुटपालनाविषयी तांत्रिक माहिती मिळाली. ग्रामप्रिया कोंबड्याचे व्यवस्थापन, लसीकरण, खाद्य याबाबत मार्गदर्शन झाले. या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न घेण्याची दिशा मिळाली. -श्रीमती गुलाब नजमा पठाण, चिंचविहिरे ‘प्रथम शेतकरी’ उपक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. -डॉ. पंडीत खर्डे, प्रमुख समन्वयक, शेतकरी प्रथम प्रकल्प संपर्क- ८२७५०३३८२२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.