औरंगाबाद जिल्ह्यातील गोलटगाव येथील सुदामआप्पा साळुंके यांनी अतीव कष्ट, अभ्यासातून विविध पिकांसह ७० एकरांत फळबाग केंद्रित शेतीचा आदर्श उभारला. शेळीपालन केले. अनिल व अजय या दोन्ही मुलांनी वडिलांचा वारसा चालू ठेवला. 'रडायचं नाही, लढायचं' हाच मंत्र जपत दुष्काळाशी अखंड लढत साळुंके परिवाराने शेतीत आजही उत्साह कायम ठेवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गोलट येथील कृषिभूषण सुदामआप्पा निवृत्ती साळुंके यांचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांची ७० एकर शेती आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अनिल व अजय ही दोन मुले शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थात वयाची पंचाहत्तरी गाठूनही सुदामआप्पा आजही शेतीत व्यस्त असतात. साळुंके यांची शेती
शेतीतील ठळक बाबी
नर्सरीचा आधार सुमारे २०१० पासून डाळिंब रोपनिर्मिती व विक्रीचं काम साळुंके करतात. आंबा व चिकू कलमांचे कामही केले. यंदा दहा ते पंधरा हजार आंबा कलमे करण्याचा संकल्प आहे. लागणारे मदर प्लॅंट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून (परभणी) आणण्यात येतात. नर्सरी वर्षाला सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न देते. दरवर्षी ३० ते ३५ हजार रोपांपर्यंत निर्मिती पूर्वी व्हायची. यंदा पाणीटंचाईमुळे केवळ १५ ते २० हजार रोपांचीच निर्मिती करणं शक्य झालं. बांबूची पंधरा हजारांवर बेटे ओढ्याकाठी असलेली विहीर खचल्याने ओढ्याच्या काठावर जवळपास एक हजार बांबू रोपांची लागवड सुदामआप्पांनी ४० वर्षांपूर्वी केली. सध्या ४० फूट लांबीचा बांबू ५० रुपये दराने विकण्यात येतो. तोडणी खर्च काढणाऱ्याकडेच असतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. पाण्यासाठी संघर्ष एक कोटी लिटर क्षमतेची दोन व ८० लाख लिटर क्षमतेचे शेततळे आहे. दोन शेततळ्यांसाठी स्वखर्च केला. आज दुष्काळात त्यात अत्यंत कमी पाणी आहे. नाही म्हणायला त्यात मत्स्यपालनाचही प्रयोग केला आहे. आजवर आठ विहिरी व जवळपास पंधरा बोअर्स घेतले. पाण्यासाठी संघर्ष आजही सुरूच आहे.
पुरस्कारांनी गौरव सुदामआप्पांना शेतीनिष्ठ, कृषिभूषण, दूध उत्पादन, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र विकास आदी विषयांसाठीही पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ज्या कामांमुळे हा सन्मान झाला त्या मातीशी प्रामाणिक राहण्याचं काम त्यांची पुढची पिढी करते आहे. यांत्रिकीकरण जपताना दोन ट्रॅक्टर्स, ब्लोअर, मशागत, पेरणीची ट्रॅक्टरवरील सर्व अवजारे आहेत. उस्मानाबादी शेळीपालन शेतीला उस्मानाबादी शेळीपालनाची जोड दिली. एप्रिल २०१६ मध्ये बारा शेळ्यांपासून सुरू झालेला हा ‘गोटफार्म’ आता १०६ शेळ्यांपर्यंत पोचला आहे. बंदिस्त शेळीपालनाचा विचार डोक्यात होता. प्रसंगानुरूप आपल्याच शेतात चराईचा मार्ग निवडला आहे. आजवर ५५ बोकडांची विक्री केली आहे. सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून शेड उभारले. यात शेळ्यांसाठी स्वतंत्र कक्ष व पाण्याची स्वयंचलित सोय केली आहे. प्रत्येक शेळीला टॅगिंग केले आहे.
ठळक बाबी
संपर्क- सुदामआप्पा साळुंके - ९६२३५०९००८, ९४२१४३०५१० - अनिल सुदामआप्पा साळुंके- ९८२२७९०३३५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.