नारोद (जि. जळगाव) येथील जितेंद्र रामलाल पाटील यांनी फळबाग व भाजीपाला शेतीत अभ्यासू, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. निर्यातक्षम उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. विविध बाजारपेठांचा उत्कृष्ट अभ्यास व शेतकऱ्यांचे तयार केलेले संपर्कजाळे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. नारोद (ता. चोपडा, जि. जळगाव) हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. गूळ नदीचा लाभ गावाला होतो. मध्यंतरी दुष्काळात परिसरात कूपनलिका, विहिरींची पातळी कमी झाली. यंदा मात्र पाण्याची स्थिती चांगली आहे. कापूस पिकासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. अभ्यासू जितेंद्र यांची शेती
व्यावसायिक पीक पध्दती केळी
पेरू
टोमॅटो
कारले मागील लागवड हंगामात परिसरात टोमॅटोचे क्षेत्र अधिक असल्याने त्याऐवजी कारले पिकाला पसंती दिली. जानेवारीत लागवड झाल्यास पुढे मार्चमध्ये महाराष्ट्रासहित छत्तीसगढ, मध्य प्रदेशातून कारले येण्यास सुरुवात होते. दरांवर परिणाम होतो. त्यामुळे दोन महिने आधी माल आधी आणण्यासाठी नोव्हेंबर लागवडीची वेळ निवडली. रोपे तयार करून पाच एकरांत लागवड केली. पॉलीमल्चिंग, ठिबक, पाच बाय दोन फूट अंतर असे नियोजन केले. वेलींना बांबूचा आधार दिला. क्रॉप कव्हर व वाणनिवड थंडीत वेलींची वाढ चांगली व्हावी यासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग केला. त्यातून काही अंश सेल्सिअस तापमान वाढले. कमी कडू, लहान आकाराच्या कारल्याला चांगला उठाव असल्याने तशा वाणाची निवड केली आहे. त्याचा टिकाऊपणा चांगला आहे. ३४ अंश तापमानात झाडाखाली सात दिवसांपर्यंत कारली टिकून राहू शकतात. पिकाचा एकरी उत्पादन खर्च एक लाख रुपये तर त्यात क्रॉप कव्हरचा सुमारे ३५ हजार रुपये आहे. विक्री
शेतकऱ्यांचा संपर्क जितेंद्र यांची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी सतत शेतकऱ्यांच्या भेटी सुरू असतात. शंभरहून अधिक शेतकरी त्यांच्या नेटवर्कमध्ये कायम आहेत. काही खासगी कंपन्यांही आपल्या बियाण्यांचे प्रात्यक्षिक प्लॉट येथे घेतात. कंपनी अधिकारी व व्यापाऱ्यांशीही जितेंद्र यांचा चांगला संपर्क आहे. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. या सर्व माध्यमातून अभ्यासपूर्ण शेतीत जितेंद्र यांनी ठसा उमटवला आहे. जितेंद्र पाटील- ७९७२५२२७९७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.