रामकृष्ण सानप
रामकृष्ण सानप  
यशोगाथा

शेडनेटमधील बीजोत्पादनाने दिली अार्थिक बळकटी

Gopal Hage

लोणी (ता. रिसोड जि.वाशीम) येथील रामकृष्ण सानप यांनी काळानुरुप पीक पद्धतीत बदल केला. सन २०१० पर्यंत नेहमी अार्थिक चणचणीला सामोरे जाणारे हे कुटुंब अाज लाखांचे व्यवहार सहज करू शकेल इतपत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. शेडनेटमध्ये संकरीत भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून सानप आता प्रगतशील व तज्ज्ञ शेतकरी झाले आहेत. तरीही विद्यार्थी होऊन नवे शिकत राहण्याची आस त्यांनी कायम ठेवली आहे.

वातावरणातील बदल, बेरभवशाचा मॉन्सून यामुळे पारंपरिक शेतीचे गणित दरवर्षी बिघडत चालले आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्यावर विविध प्रयोगांवर मात करीत त्यावर उत्तर शोघधत आहेत. हीच दिशा अोळखून २०१० मध्ये लोणी बुद्रूक (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील रामकृष्ण सानप यांनी नियंत्रित शेतीत पाऊल टाकले. ज्ञान घेण्याची तयारी, जिद्द आणि मेहनतीची तयारी या गोष्टींच्या आधारे आज ते यशस्वी संकरीत भाजीपाला बिजोत्पादक झाले आहेत.    शेतीत घडवलेल्या सुधारणा  संकरीत भाजीपाला बिजोत्पादन हे अत्यंत क्लिष्ट, मजुरांची गरज असलेले व तांत्रिक दृष्ट्या कुशल काम आहे. परपरागीभवनाची क्रिया देखील यात महत्वाची असून त्यावरच बियाची प्रत व बियाणे पास-नापास या बाबी अवलंबून असतात. ही सर्व जोखीम पत्करून सानप अाज दीड ते पावणे दोन एकरांत संकरीत भाजीपाला बीजोत्पादन करतात. उर्वरित शेतीत ते सोयाबीन, तूर, कपाशी अशी पिके घेतात. सोयाबीन, तुरीची उत्पादकता चांगली आहे. मात्र काळाशी सुसंगत राहाताना दोन्ही पिकांचा उत्पादन खर्च त्यांनी कमी केला. रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर घटविला. 

शेडनेटमधील शेती फायदेशीर  सन २०१२ मध्ये सानप यांनी शेडनेटमध्ये कंपन्यांसाठी बीजोत्पादन सुरू केले. बियाणे, तांत्रिक माहिती, वेळोवेळी मार्गदर्शन कंपनीकडून दिले जाते. शेतकऱ्याने त्या वेळापत्रकानुसार मेहनत घेतली तरी तो चांगले अर्थार्जन करू शकतो. ही शेती करार पद्धतीने केली जाते. शेतकरी जे बीजोत्पादन करतो त्याचा दर कंपनीकडून आधीच निश्चित केलेला असतो. त्यामुळे दरांची चिंता राहात नाही. 

संपूर्ण कुटुंब राबते नियंत्रित शेतीत रामकृष्ण सानप यांना पत्नी, दोन मुले, सुना आहेत. सर्वजण शेतीत राबतात. सानप वयाच्या साठीकडे  झुकले तरी त्यांचे या शेतीतील ज्ञान, तळमळ वाखाणण्याजोगी आहे. सन २०१२ मध्ये या भागात पहिले शेडनेट उभारण्याचे धाडस त्यांनी केले. या प्रयोगात अनेक अडचणी येणार हे माहित होते. त्यासाठी त्यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले. मुलाला तळेगाव दाभाडे (पुणे) येथे त्यासंबंधीचे प्रशिक्षण दिले. शिवाय वेळोवेळी करडा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून तेथील तज्ज्ञांकडूनही माहिती घेतली. ही शेती सुरू करून पाच वर्षे लोटली. या काळात आता सर्व बारीकसारीक ज्ञान आत्मसात केले आहे. सानप आता स्वतःच आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत पोचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ गावात १० ते १२ शेतकऱ्यांनी शेडनेट उभारून कंपन्यांसाठी बीजोत्पादन सुरु केले आहे. सानप यांना अर्ध्या एकरातील शेडनेटसाठी दहा लाख रुपये अनुदानही मिळाले आहे.  

मानसन्मानाचे दिवस आले अंगणी ! नवी पीकपद्धती व तंत्राचा अवलंब करीत सापन यांनी इतरांना दिशा दिली आहे. आज त्यांच्या कुटुंबात आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यांना कृषी समृद्धीचा पुरस्कार तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरावरील दुसरा पुरस्कार मिळाला आहे. विविध कंपन्यांचे अधिकारी, नेते त्यांच्या या शेतात भेटी देत असतात. एवढे सारे झाले तरी त्यांची नवनवीन ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा कायम आहे. जेजे चांगले असेल त्याचा स्वीकार ते नम्रपणे करतात. 

स्वतः पारंगत झाले; कुशल कामगार घडविले  सानप कुटुंबाची सात एकर शेती आहे. सुरवातीला ते पारंपरिक शेती करायचे. त्यातून जेमतेम उत्पन्न मिळायचे. एवढ्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच प्रगती होऊ शकत नाही हे जाणून २०१२ मध्ये शेडनेट शेती करण्यास सुरवात केली. त्यात आज ते खासगी कंपन्यांसाठी बीजोत्पादन घेतात. यात काकडी, दोडका आदी पिकांचा समावेश आहे. पॉली मल्चिंग व ठिबक यांचा वापर करण्यात येतो. परागीकरण करण्यासाठी कुशल कामगारांची गरज असते. असे कुशल कामगार सानप यांनी गावातच घडविले. स्थानिक महिलांना हे तंत्र शिकवले. आज गावातील मजूर सर्वच प्रकारची कामे करण्यात पारंगत झाले आहेत. त्यांना वर्षभर मजुरी उपलब्ध झाली आहे. वर्षभरात तीन ते साडेतीन लाख रुपये मजुरी यावरच खर्च होते. 

" कृषी समृद्धी प्रकल्पाअंतर्गत व कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्या माध्यमातून संकरीत भाजीपाला बिजोत्पादन कार्यक्रमाचा जिल्हयात प्रसार करण्यात अाला. अाज शेतकरी संकरीत बिजोत्पादन कार्यक्रम यशस्वी राबवित अाहेत" निवृत्ती पाटील, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), करडा कृषी विज्ञान केंद्र जि.वाशीम    

संपर्क :  रामकृष्ण सानप, ९८८१७२५९१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT