खिलार गाईंसोबत शशिकांत पुदे.
खिलार गाईंसोबत शशिकांत पुदे. 
यशोगाथा

दूध, तूप विक्रीतून वाढविला नफा

Sudarshan Sutaar

 शेतकरी ः शशिकांत पुदे  शेज बाभूळगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर

शेज बाभूळगाव (ता. मोहोळ) येथील शशिकांत पुदे यांनी काजळी खिलार गाईंचा गोठा उभारला आहे. जातिवंत दुधाळ गाई आणि वळू त्यांच्या गोठ्यात आहेत. बाजारपेठ लक्षात घेत त्यांनी दूध विक्रीसह तूपनिर्मितीवर भर दिला. याचबरोबरीने राज्यभरातून कालवड आणि वळूला चांगली मागणी आहे. शशिकांत पुदे हे काजू, चिकू, पेरू आणि आंबा उत्पादक प्रयोगशील शेतकरी. अलीकडेच त्यांना राज्य शासनाचा उद्यानपंडित पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्याकडील देशी गाईंचा गोठा वडिलोपार्जित आहे. शेती विकासाच्याबरोबरीने त्यांनी काजळी खिलार गाईंची संख्याही वाढविली. या खिलार गाई रंगाने पांढऱ्या शुभ्र डोळे, शिंगे आणि शेपूट गोंडा काळा आहे. गाई आज्ञाधारक आहेत. गाईंसाठी पुदे यांनी शेतामध्ये सुसज्ज गोठा आणि शेण गोमूत्र गोळा करण्यासाठी टाकी बांधली आहे. शेणस्लरीचा वापर फळबागेत केला जातो. याचबरोबरीने त्यांच्याकडे आठ वर्षांपासून गोबरगॅसदेखील आहे. असे आहे नियोजन

  •   रोज पहाटे गोठा स्वच्छ केला जातो. त्यानंतर प्रत्येक गाईला अर्धा किलो शेंग पेंड आणि चारा कुट्टी दिली जाते. पाणी पाजले जाते. त्यानंतर गाईला खरारा केला जातो.
  •   सकाळी साडे सात वाजता दूध काढणी झाल्यानंतर मुक्त संचार गोठ्यात गाई सोडल्या जातात. दुपारी बारा वाजता पाणी पाजून त्यांना सावलीत बांधले जाते. दुपारी चार वाजता पुन्हा गाई मोकळ्या सोडल्या जातात. सायंकाळी पाच वाजता गाई गोठ्यात घेऊन शेंग पेंड आणि मक्‍याचा भरडा प्रत्येकी एक किलो आणि चारा कुट्टी दिली जाते. सायंकाळी साडे सहाला धार काढली जाते. 
  •   गाई, वासरांना पुरेसे खाद्य, पाणी दिले जाते. वेळेनुसार लसीकरण केले जाते. आठवडाभरातून एकदा गाई आणि वळूंना स्वच्छ धुतले जाते. 
  • कालवड, वळूंची आगाऊ नोंदणी पुदे यांच्याकडे खिलार गोवंशाची तीन पिढ्यांची वंशावळ आहे. त्यामुळे त्यांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ गाई आणि वळू तयार होतात. एक गाय दररोज सरासरी ८ ते १० लिटर दूध देते. सध्या गोठ्यात नऊ गाई, दोन कालवडी आणि तीन वळू आहेत. त्यापैकी सहा खिलार गाई दुधात आणि तीन गाभण आहेत. सध्याच्या काळात गाई दुधाच्या शेवटच्या टप्प्यात असून एक गाय दररोज तीन ते चार लिटर दूध देते. पुदे दरवर्षी चार कालवडी आणि दोन खोंड विकतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून या वर्षीच्या कालवडी आणि वळूंसाठी आगाऊ नोंदणी पूर्ण झाली आहे. मिळविले स्थानिक मार्केट  देशी गाईंचे दूध आणि तुपाला सर्वाधिक मागणी आहे. पण मागणीएवढा पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पुदे यांनी दूध आणि तुपाला स्थानिक भागात मार्केट तयार केले. सध्याच्या काळात दररोज १५ लिटर दूध जमा होते. हे दूध मोहोळ शहरातील ग्राहकांना ८० रुपये प्रतिलिटर या दराने विकले जाते. त्याशिवाय दर महा तीन ते पाच किलो तूपनिर्मिती केली जाते. तुपाला प्रतिकिलो तीन हजार रुपये दर आहे. दूध, तूप विक्रीसाठी त्यांनी शिवपार्वती ब्रॅंन्ड तयार केला आहे. खिलार वळूंचा उपयोग रेतनासाठी होतो. परिसरातील शेतकरी खिलार गाई रेतनासाठी त्यांच्या गोठ्यात घेऊन येतात. एका गाईंच्या रेतनासाठी ११०० रुपये दर आहे. महिन्याकाठी व्यवस्थापन खर्च वजा जाता खिलार गोवंश संगोपनातून पुदे यांना बारा हजारांचा निव्वळ नफा मिळतो.

      शशिकांत पुदे, ९७६५४१५१९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT