देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफा
देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफा  
यशोगाथा

देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफा

Raj Chougule

देशी गायींचे चांगले व्यवस्थापन करून या गाईंच्या संगोपनाबाबत जनजागृतीचे काम खेबवडे (जि. कोल्हापूर) येथील अरुण पाटील करत आहेत.

पाटील यांनी १९९५ पासून गोपालनास सुरवात केली. त्यांनी पहिल्यांदा कोकणगिड्ड जातीची गाय आणली. त्यानंतर पुढे टप्याटप्याने गीर गाईंची संख्या वाढवत नेली. जादा दूध देणाऱ्या गायीची अपेक्षा न ठेवता शेती आणि आरोग्य संवर्धनाचा दृष्टिकोन समोर ठेऊन पाटील देशी गाईंचे संगोपन करतात. स्वतःच्या गोठ्यात त्यांनी जातीवंत दुधाळ गीर गाई तयार केल्या. सध्या गोठ्यात पाच गीर गाई, दोन गीर वळू, एक कॉंक्रेज गाय आणि दोन वासरे आहेत. या पैकी एक गीर गाय दहाव्या वेताची आहे. सध्या तीन गीर गाई दुधात आहेत. दोन गाई गाभण आहेत. सध्या दररोज २२ लिटर दूध संकलन होते. दूध विक्रीपेक्षा तूप विक्रीवर त्यांचा भर आहे. अरुण पाटील यांचा देशी गायींच्या व्यवस्थापनाचा चांगला अभ्यास आहे. देशी गायींपासून दुग्धोत्पादन, प्रक्रिया उत्पादने आणि त्याला बाजारपेठेत मिळणारा दर याचे गणित घालून ही गाय आर्थिकदृष्ट्या कशी फायदेशीर ठरू शकते, याबाबत शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात.  

गाईंचे व्यवस्थापन   

  • सकाळी चार वाजता गाय, गोठा स्वच्छता. प्रत्येक गायीस सकाळी आणि संध्याकाळी आठ किलो हिरवा चाऱ्याची कुट्टी. हिरव्या चाऱ्यात मका, कडवळ, नेपिअर, ऊस वाढ्याचा वापर. दोन किलो पेंड, भुश्‍याचा खुराक. गाईंना पुरेसे पाणी पाजले जाते.
  • प्रत्येक गायीला दररोज दुपारी चार लिटर ताक पाजले जाते. ताकामुळे गायींची पचनक्रिया सुधारते.
  • दर चार महिन्यांनी जंतनिर्मूलन. आरोग्य तपासणीवर भर.
  • शेण, घनजीवामृत शेतीमध्ये वापरले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे.
  • ठराविक वेळेत गोमूत्र गोळा केले जाते. गोमूत्रापासून जीवामृतनिर्मिती. त्याचा शेतीमध्ये वापर केला जातो. गोमूत्र अर्क निर्मिती.
  • तूप विक्रीतून वाढविला नफा   अलीकडे गोपालक फक्त दुधाच्या विक्रीसाठी देशी गायीचे पालन करतात. मात्र पाटील यांनी दुधाएेवजी तूप निर्मितीकरून त्याच्या विक्रीवर भर दिला आहे. सरासरी २७ लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होते. सकाळ व संध्याकाळच्या धारा काढल्यानंतर चुलीवर दूध तापविले जाते. सायंकाळी विरजण लावले जाते. विरजण झाल्यानंतर यांत्रिक रवीद्वारे ताक घुसळून लोणी काढले जाते. प्रति किलोस २२०० रुपये या प्रमाणे तुपाची विक्री होते. ग्राहक घरी येऊन तूप घेऊन जातात. महिन्याला सुमारे ३५ किलो तूप तयार केले जाते. तूप विक्रीतून वीस टक्के नफा रहातो, असे पाटील सांगतात.

    संपर्क : अरुण पाटील, ८२७५२६७९३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT