डाळिंब बागेत सचिन व लक्ष्मण हे काळे बंधू.
डाळिंब बागेत सचिन व लक्ष्मण हे काळे बंधू.  
यशोगाथा

आत्मविश्‍वास, हिंमतीतून फळशेती केली फायद्याची

Suryakant Netke

देशमुखवाडी (ता. कर्जत) येथील लक्ष्मण व सचिन काळे या चुलत बंधूंनी कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मदतीने डाळिंब, केळी या फळपिकांची शेती आत्मविश्‍वासपूर्वक फायद्याची केली आहे. यंदा आठ टन डाळिंबाची मध्यस्थांमार्फत दुबईला निर्यात करणे त्यांना शक्य झाले आहे. फळांचा दर्जा चांगला असल्याने व्यापारी मालाची शेतातूनच खरेदी करतात. दुष्काळात पाणी कमी पडले, त्या वेळी पीक हातचे गेले. मात्र हिंमत न हारता पुन्हा जोमाने काळे यांनी शेतीतून समाधानाचे फळ फुलवले आहे. नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. काही भागाला कुकडी कालव्याचे पाणी मिळते. त्यातूनच शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके घेण्याची धडपड सुरू असते. तालुक्‍यातील राशीनजवळ असलेल्या देशमुखवाडी येथे हनुमंत आणि अशोक या काळे बंधूंचा परिवार राहतो. हनुमंत यांना लक्ष्मण आणि नवनाथ ही दोन मुले तर अशोक यांना सचिन हा मुलगा. सोळा-सतरा जणांचे हे एकत्रित कुटुंब आहे. शेतीतून समृद्धी मिळवण्यासाठी परिवाराची कायम धडपड असते. त्यासाठी शेतीचे योग्य नियोजन व पीकपद्धतीची घडी बसवण्याचा प्रयत्न काळे यांनी केलाय काळे यांचे शेतीचे नियोजन कुटुंबातील लक्ष्मण व सचिन हे नव्या पिढीतील सदस्य शेतीची जबाबदारी पाहतात. वडिलोपार्जित दहा एकर जमीन. सध्या डाळिंबाची लागवड केलेली तीन एकर जमीन विकत घेतलेली. गरजेच्या वेळी घरातील अन्य सदस्यांचाही पुढाकार असतो. सध्याची पिके

  • डाळिंब व केळी- प्रत्येकी २ एकर
  • ऊस- १ एकर
  • तूर, मका प्रत्येकी २ एकर
  • बाजरी- दीड एकर
  • शेतीची वैशिष्ट्ये

  • देशमुखवाडी परिसरात बाजरी, ज्वारी अशी भुसार पिके घेतली जात. काळे यांनी त्यात बदल करताना भगवा डाळिंबाच्या ६०० झाडांची लागवड केली. दोन वर्षांनी पहिले उत्पादन हाती आले. त्यावेळी तीन ते साडेतीन टन उत्पादन आणि ६० रुपये प्रति किलो दर मिळाला. उत्पादनात वाढ आणि फळांचा दर्जा चांगला मिळावा यासाठी सेंद्रिय खतांचा वापर सुरू केला.
  • पाण्याच्या नियोजनानुसार मृग किंवा हस्त बहाराचे नियोजन. बहार धरल्यावर प्रति झाड दहा किलो शेणखत
  • दर पंधरा दिवसांनी गोमूत्राची मात्रा
  • शेणखत, बेसनपीठ, गुळ, उसाचा रस यांची स्लरी करून दर दोन महिन्यांनी वापर
  • डाळिंबाच्या प्रति झाडाला पहिल्या पाण्यानंतर एक किलो पोल्ट्रीखत. केळीला बांधणीनंतर दोन एकरांत सहा टॅक्‍टर शेणखत व एक टॅक्‍टर पोल्ट्रीखत
  • डाळिंबाच्या झाडांना फळांचे वजन पेलवत नसल्याने बांबूचा आधार द्यावा लागला आहे.
  • सतत व्यापाऱ्यांच्या संपर्कात

  • यंदा दोन एकरांत डाळिंबाचे पंचवीस टन उत्पादन मिळाले. आठ टन डाळिंबाची ९१ रुपये प्रति किलो दराने दुबईला निर्यात करण्यासाठी बारामती (कुरकुंभ) येथील एका कंपनीस विक्री.
  • उर्वरित १७ क्विंटल फळाची जागेवर ३५ रुपये प्रति किलो दराने सांगोला (जि. सोलापूर) येथील व्यापाऱ्याला विक्री केली. स्थानिक व्यापाऱ्यांकडून समाधानकारक दर मिळत नाही. हा अनुभव असल्याने डाळिंब तोडणीस आले की सचिन व्यापाऱ्यांशी संपर्क करतात. त्यातून बाजारातील दरांचा अंदाज येतो. योग्य दर देणाऱ्यासच जागेवर विक्री होते. तोडणीसाठी शेजारच्या गावातील मजुरांची मदत घेतली जाते.
  • केळीची लागवड ठरली फायद्याची देशमुखवाडी परिसरात अलीकडे शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळी पिके घेत आहेत. त्यात डाळिंब, केळी अादी फळपिकांना अधिक प्राधान्य दिले जाते. काळे यांनी गेल्या वर्षी दोन एकरांवर केळीची लागवड केली. त्यात सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा वापर केला. दोन एकरांत चाळीस टन उत्पादन मिळाले. विक्रीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांना केली. किलोला सात ते आठ रुपयांपेक्षा जास्त दर द्यायला व्यापारी तयार नव्हते. मात्र काळे यांनी पुण्यातील व्यापाऱ्याशी संपर्क साधून जागेवरच साडेअकरा रुपये दराने विक्री यशस्वी साधली. दहा जनावरांचे संगोपन शेतीत शेणखताचा वापर करण्याला प्राधान्य दिले. सध्या संकरीत चार गायी, तीन म्हशी, दोन बैल, आणि वासरे अशा सुमारे दहा जनावरांचे संगोपन होते. घरातील गरज भागवून पंचवीस लिटर दुधाची खासगी संस्थेला विक्री केली जाते. वर्षाकाठी जनावरांपासून बारा ते पंधरा टन शेणखत मिळते. शिवाय गायींपासून एक हजार ते बाराशे लिटर गोमूत्र मिळते. दुष्काळातही नाही खचले दोन विहिरी आहेत. कुकडी कालव्याला पाणी आले की कालव्याजवळील विहिरीला चांगला फायदा होतो. त्यामुळे गरजेच्या वेळी एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी टाकण्यात येते. सन २०१५ मध्ये कर्जत तालुक्‍याला दुष्काळाचा गंभीर फटका बसला. या काळात अनेकांकडील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. काळे यांच्या बागेतही डाळिंब लागले आणि पाणी कमी पडले. मोठ्या आशेने विंधनविहीर घेतली. त्यासाठी ७२ हजार रुपये खर्च केला. पण पाणी लागले नाही. पाण्याअभावी फळे वाया गेल्याने त्यावेळी एकूण दीड लाख रुपये केलेला खर्च पाण्यात गेला. दुष्काळात फटका बसूनही काळे बंधू खचले नाहीत. पुन्हा नव्या जोमाने त्यांनी शेती फुलवली. काळे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • डाळिंब, केळी आदी व्यावसायिक पिकांची लागवड
  • गोमूत्र, सेंद्रिय स्लरीच्या वापरातून पिकाची गुणवत्ता, फळाचा आकार, वजनवाढ
  • त्यामुळे मालाची जागेवर खरेदी
  • दुष्काळातही हिंमतीने जोपासली बाग
  • फळांची राखण करण्यासाठी मचाण
  • शेणखतासाठी जनावरांची जोपासना
  • चाऱ्यासाठी एकरभर उसाची लागवड
  • संपर्क : सचिन काळे, ७२१९३५८७८४, ९८५०१०११८३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

    Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    SCROLL FOR NEXT