शेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व
शेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व  
यशोगाथा

शेळीपालनाने कमी केले शेतीवरचे अवलंबित्व

Santosh Munde

शेतीला पूरक उद्योगाची जोड म्हणून संतोष बिल्हारे यांनी २०१६ मध्ये शेळीपालनाला सुरवात केली. अर्धबंदिस्त शेळीपालनातून त्यांना वर्षाला किमान ८० हजारांचा आर्थिक हातभार लागतो. चार शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता वीस शेळ्यांवर पोहचला आहे. पुढे शेळ्यांची संख्या किमान ५० पर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे.  

असे वळले शेळीपालनाकडे बिल्हारे यांची चार एकर कोरडवाहू शेती अाहे. शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड जात होते. या आर्थिक विवंचनेतून कमी गुंतवणुकीत केला जाणारा शेळीपालन व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. नोव्हेंबर २०१६ मध्ये १९ हजारांमध्ये ४ उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यांच्याकडे अाज २० शेळ्या अाहेत. त्यामध्ये करडं विकून घेतलेल्या सहा व घरच्याच शेळ्यांपासून मिळालेल्या दहा शेळ्यांचा समावेश आहे.

व्यवस्थापन

  • सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेळ्या बंदिस्त असतात. दुपारी दोन नंतर आसपासच्या परिसरात सर्व शेळ्या ते स्वत: चारण्यासाठी घेऊन जातात.
  • सायंकाळी शेळ्यांना ओला अाणि सुका चारा दिला जातो. अोल्या चाऱ्यासाठी अर्धा एकर क्षेत्रावर शेवरी, तूती अाणि दीनानाथ गवताची लागवड केली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा अाणि ज्वारीचा कडबा सुका चारा म्हणून दिला जातो.  
  •  तुतीची पाने जाड अाणि मोठी असतात शिवाय शेळ्या ती अावडीने खातात. तुतीचा पाला शेळ्यांना हवा तेव्हा उपलब्ध होण्यासाठी गोठ्यामध्ये बांधून ठेवला जातो.  
  •  सकाळी शेळ्यांना सोयाबीन, गहू अाणि मक्याचा भरडा दिला जातो.
  • उस्मानाबादी शेळ्या काटक असल्यामुळे त्या प्रतिकूल हवामानातही तग धरून राहतात असा बिल्हारे यांचा अनुभव अाहे. खबरदारी म्हणून सर्दी, हगवण, ताप, जखमा इ. अाजारांवर पशुवैद्यकानी दिलेली अाैषधे गोठ्यामध्ये असतात.
  • तीन महिन्यांतून एकदा शेळ्यांना जंतनाशक देण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे शेळ्यांचे अारोग्य चांगले राहते.  
  • वीस शेळ्यांपासून त्यांना वर्षाकाठी तीन ट्रॉली लेंडी खत मिळते. त्यामुळे खतावरील खर्चात बचत झाली अाहे.
  • आजपर्यंत त्यांनी १६ ते १७ करडांची विक्री अाहे. साधारणपणे प्रति करडू साडेचार ते पाच हजार रु. दर मिळाला.
  • संपर्क : संतोष बिल्हारे, ८३२९६०१६२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

    Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

    Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

    Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

    River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

    SCROLL FOR NEXT