शेवगाव शहरात थेट दूध विक्री
शेवगाव शहरात थेट दूध विक्री  
यशोगाथा

निर्भेळ, सकस दूध उत्पादन, थेट विक्रीही

Suryakant Netke

सुळेपिंपळगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील राहुल व सचीन या देशमुख बंधूंनी दुष्काळी भागातही दुग्ध व्यवसाय नेटाने चालवला आहे. सध्या ३७ म्हशींचे संगोपन ते करतात. सेंद्रिय पद्धतीने चारा उत्पादन, सकस व निर्भेळ दूध उत्पादन करून दररोज २४० लिटरपर्यंत थेट विक्री, गांडूळखत निर्मिती आदी विविध वैशिष्ट्ये जपत त्यांनी पंचक्रोशीत आपल्या गुरुदत्ता दुग्धालयाची अोळख तयार केली आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव-बोधेगाव रस्त्यावर उत्तरेला सुळे पिंपळगाव हे छोटंसं खेडं आहे. येथील राहुल दत्तात्रेय देशमुख यांनी उच्च शिक्षण घेतल्यावर रोजगाराचा शोध सुरू केला. घरची परिस्थिती सर्वसाधारण. शेतकरी कुटुंब. राजकारणातही काहीसा रस असलेला तरुण कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख. या भागात पुरेसा पाऊस होत नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. राहुल यांनी पाच वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यासाठी ३७ एचएफ गायी आणल्या. त्यातून संकलित होणारे पावणेदोनशे ते दोनशे लिटर दूध ते संकलन केंद्राला पुरवत. मात्र मिळणारा दर, उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ लागत नव्हता. व्यवसाय स्थिर करण्यासाठी केलेले उपाय

  • अर्थकारण फायदेशीर होत नाही म्हटल्यावर गायींची विक्री केली. त्याएेवजी म्हशींवर आधारित दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • संघाला दूध पुरवण्यापेक्षा थेट विक्री करण्याचे ठरवले.
  • स्थानिक बाजारातून म्हशींची खरेदी सध्या राहुल व सचिन असे दोघे बंधू व्यवसाय सांभाळतात. नव्याने व्यवसाय उभारताना घोडेगाव व स्थानिक बाजारातून चार म्हशी खरेदी केल्या. टप्प्याटप्याने ३७ जातिवंत म्हशी खरेदी केल्या. याच भागातील म्हशी असल्यामुळे वातावरण पोषक मिळाले. त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. आजचा दुग्ध व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • जनावरे -
  • म्हशी - मुऱ्हा - २७, जाफराबादी - १०
  • वासरे - ३७, गावरान गायी - ३, पारठ्या म्हशी व कालवडी प्रत्येकी - ५
  • गोठ्यातील जनावरांचे मूत्र खड्ड्यात साठवून ते  मडपंपाद्वारे शेताला दिले जाते.
  • शेती ३० एकर -

  • ऊस - ४ एकर, मका - ६ एकर.
  • चारा पिके १५ एकर.यात मका, कडवळ, मेथी घास, ऊस, गिन्नी गवत
  • गांडूळखत प्रकल्प - १० गुंठे -
  • प्रति बॅच उत्पादन - ३० ते ३५ टन - काही खतांची विक्री - दर सात हजार रुपये प्रतिटन
  • संपूर्ण चारा पिकांसाठी -
  • यात रासायनिक खतांचा जराही वापर नाही. केवळ सेंद्रिय घटक. त्याचे फायदे-
  • जनावरांना सकस चारा
  • दुधाची वाढीव गुणवत्ता
  • रासायनिक खतांच्या खर्चात बचत
  •  विक्री व्यवस्था

  • रोजचे दूध संकलन - २४० लिटर -
  • विक्री -शेवगाव - रतीब सुमारे ३० ते ४० लिटर, उर्वरित थेट काउंटरवरून विक्री
  • गुरुदत्ता दुग्धालय नावाने    पाण्याची संरक्षित व्यवस्था केली सुळे पिंपळगाव परिसरात कायम दुष्काळी स्थिती. सुरवातीला विकतचे पाणी आणून जनावरे जगवावी लागली. त्यामुळे राहुल यांनी शेताजवळून जाणारा छोटा ओढा अडवून नैसर्गिक लहान तलाव केला. त्यात पाणी साठल्यावर शेजारच्या त्यांच्या विहिरीची पाणीपातळी काहीशी वाढली. तालुक्‍याच्या समाजकारणात राहुल अग्रेसर व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे कार्यकर्ते. त्यामुळे या भागातून वाहणाऱ्या नदीवर बंधारे बांधावेत, अशी विनंती त्यांनी घुले पाटील यांना केली. त्यातून टंचाईग्रस्त गावांना निधी उपलब्ध झाला. त्यातून चार वर्षांपूर्वी तीन बंधारे बांधले. नदीचे खोलीकरण केले. आता आसपासच्या विहिरींची पाणीपातळीही वाढली आहे. जानेवारीतच पाणीटंचाई निर्माण व्हायची. आता मे-जूनपर्यंत हमखास पाणी पुरते. त्याआधारे चाऱ्याचे नियोजन होते.
  • व्यवसायातील ठळक बाबी

  • अनेक ठिकाणी दुधात वाढ व्हावी, यासाठी म्हशीची वासरे (वगारी व रेडकू) सांभाळली जात नाहीत. देशमुख यांनी मात्र आत्तापर्यंत सर्व वासरे सांभाळली. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था.
  • म्हशीचे दूध काढण्यापासून चाराकापणी, पाणी व अन्य व्यवस्थापनासाठी - सहा व अन्य कामांसाठी दोन महिला असे एकूण ८ कामगार
  • म्हशींना दूध देण्याच्या क्षमतेनुसार खुराक
  • यंत्राएेवजी हाताने दूध काढले जाते.
  • दररोज प्रत्येक म्हशीच्या दुधाची वहीत नोंद
  • ॲग्रोवनचे नियमित वाचक राहुल ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. त्यातील दुग्ध व्यवसाय विषयातील लेख, यशकथा ते आवर्जून वाचतात. या व्यवसायासंबंधित अनेक ठिकाणी जाऊन पाहणी व अभ्यासही केला आहे. संपर्क - राहुल देशमुख - ९६२३७७७३३३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT