रखमाजी जाधव यांनी ११० गायींचे संगोपन करताना दुग्धव्यवसाय विस्तारला आहे.
रखमाजी जाधव यांनी ११० गायींचे संगोपन करताना दुग्धव्यवसाय विस्तारला आहे. 
यशोगाथा

मुरघास, शेणखत विक्रीमुळेच तरला ११० गाईंचा दुग्ध व्यवसाय

Suryakant Netke

पाथरे खुर्द (ता. राहुरी) येथील रखमाजी बन्सी जाधव यांनी चार गाईंपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आधुनिक तंत्राद्वारे ११० गाईंपर्यंत विस्तारला आहे. सध्याच्या काळात दुग्ध व्यवसाय चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. अशा स्थितीत दोन वर्षे पुरेल एवढा मुरघास, त्यातून खर्चात बचत, शेणखताची विक्री या बाबींच्या नियोजनामुळेच या व्यवसायात तरणे शक्य झाले, तेच मोठे समाधान असल्याची भावना जाधव व्यक्त करतात. नगर जिल्ह्यातील पोथरे खुर्द येथील प्रगतिशील शेतकरी रखमाजी बन्सी जाधव सुमारे १९९० पासून दुग्ध व्यवसाय करतात. या व्यवसायात आज मुलगा सुरेंद्र व बंधू शेषराव मदत करतात. जाधव यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

  • दुग्ध व्यवसायाची सुरवात - ४ गायी
  • त्यात टप्प्याटप्प्याने वाढ केली. मध्यंतरीच्या काळात अर्थकारणही बिघडले.
  • सन २००६ साली व्यवसायात सुधारणा करून ४० गायींचा मुक्तसंचार गोठा
  • त्यातून दररोज ४०० ते ५०० लिटर दूधसंकलन
  • गावात स्वतःचे दूध संकलन केंद्र. त्यामार्फत संघाला दूध जायचे.
  • गेल्या वर्षी दोन एकरांवर पावणेदोन कोटी रुपये खर्च करून मुक्त संचार गोठा उभारला.
  • याच चार कप्पे. प्रत्येक कप्प्यात ७५ गायी राहण्याची क्षमता. कालवडीसाठी स्वतंत्र कप्पा.
  • गायींची स्थानिक बाजारातूनच खरेदी
  • सध्याची संख्या

  • ११०- एकूण गायी-लहान-मोठ्या धरून
  • ७०- दुभत्या गायी (एचएफ)
  • २०- गाभण
  • २०- वासरे
  • ७०० ते ८०० लिटर- दररोजचे दूध संकलन
  • सुविधा मिल्किंग पार्लर

  • मुक्त गोठ्याशेजारीच ही सुविधा
  • यंत्राद्वारे दूध काढण्यासाठी विशिष्ट वेळी मिल्किंग पार्लरजवळ गायी आणल्या जातात.
  • एका बाजूने नऊ अशा दोन्ही बाजूंनी १८ गायी उभ्या केल्या जातात.
  • दूध थेट कूलिंग मशिनमध्ये पोचवले व साठवले जाते.
  • साधारण २३०० ते २५०० हजार लिटर दूध खरेदीदार संघातर्फे स्वतंत्र वाहनातून नेले जाते.
  • दुधाला कुठेही मानवी स्पर्श होत नाही. त्यामळे आरोग्य व दर्जा टिकून राहतो.
  • दुधाचा दर्जा यातून टिकवला

  • उत्तम खाद्य आरोग्य हायजेनिक तंत्र सुविधा
  • विक्री- ‘डायनामिक्‍स डेअरी ॲग्रोमार्फत.
  • दर - २२ ते २५ रुपये प्रतिलिटर. दर्जामुळे बाजारापेक्षा प्रतिलिटरला काही रुपये अधिक मिळतात.
  • दुग्ध व्यवसाय का परवडतो? जाधव म्हणतात की खर्च वाढले, त्या तुलनेत अत्यंत कमी दर त्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नाही. मग हा व्यवसाय तारून नेण्यासाठी खालील बाबींवर भर दिला.

  • दोन वर्षे पुरेल एवढा मुरघास - त्यातून खर्चात बचत
  • शेणखताची दररोज विक्री
  • ऑगस्ट २०१६ मध्ये मुरघास तयार करण्यासाठी चार खड्डे तयार केले. त्यात मका, बाजरीचा भुसा करून टाकला.
  • तयार झालेला मुरघास - तब्बल दोन हजार टन
  • गेल्या वर्षभरापासून त्याचा चाऱ्यासाठी वापर
  • गाईंना दररोज साधारण २० ते ३० किलो दिला जातो.
  • सद्यःस्थितीत काही दिवस पुरेल एवढा मुरघास शिल्लक.
  • शिवाय गरजेनुसार २१.५० रु. प्रतिकिलो दरानेही त्याची खरेदी
  • शेणखताची विक्री

  • सुमारे ११० गायी
  • प्रत्येक दोन दिवसांनी उपलब्ध होणारे शेण - दोन ट्रॉली
  • विक्री - शेतकऱ्यांकडून शेणखताला मोठी मागणी अाहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, निफाड, विंचूर येथील बाजारात तीन हजार रुपये प्रतिट्रॉली दराने विक्री.
  • महिन्याला वाहतूक व अन्य खर्च वजा जाता सुमारे ७० हजार रुपये उत्पन्न मिळते.
  • सत्तावीस एकर क्षेत्राला गोमूत्र जाधव यांची २७ एकर शेती असून, ऊस ते त्यांचे मुख्य पीक आहे. उसाला गोमूत्राची मात्रा दिली जाते. त्यासाठी मुक्तसंचार गोठ्यातून गोमूत्राची साठवण करण्यासाठी बाजूला १२ हजार लिटर साठवण क्षमतेचा विहिरीसारखा मोठा खड्डा घेतला आहे. दररोज सुमारे एक हजार लिटर गोमूत्राची साठवण होते. या भागात डाळिंब व अन्य फळभागांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी शेतकरीही ते घेऊन जातात. एक रुपया प्रतिलिटर दराने त्याची विक्री केली जाते. जाधव यांच्या दुग्ध व्यवसायाची वैशिष्ट्ये

  • एकाच वेळी सर्व गुंतवणूक न करता टप्प्याटप्प्याने विस्तार
  • मुरघास केल्याने गाईंची संख्या जास्त असूनही चाऱ्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला.
  • दूधनिर्मितीत मानवी संपर्क नसल्याने दर्जा टिकून
  • गोठ्यात व परिसरात स्वच्छता. त्यामुळे आजाराचे प्रमाण अल्प.
  • जागेवरूनच दुधाची उचल. त्यामुळे वाहतुकीचा खर्च नाही
  • गोठा व्यवस्थापनासाठी सहा कामगार कार्यरत
  • संपर्क- रखमाजी जाधव - ९८२२४४९७२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT