बबन ठोंबरे यांनी पेरूचे घेतलेले उत्पादन
बबन ठोंबरे यांनी पेरूचे घेतलेले उत्पादन  
यशोगाथा

शेतीसह पूरक व्यवसायातून उंचावतेय अर्थकारण

डॉ. मिलींद जोशी

पुणे जिल्ह्यातील पाटस येथील बबन ठोंबरे यांनी डाळिंब, पेरू ही फळपिके व त्यांना पोल्ट्री व शेळीपालन अशी पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. त्यातून एकात्मिक शेतीचा डोलारा सांभाळत शेतीचे अर्थकारण उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.   पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड असे तालुके नेहमीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असतात. हे तालुके सीताफळ, अंजीर, डाळिंब आदी फळपिकांसाठी प्रसिद्धही आहेत. प्रतिकूलतेतही संधी मानून येथील अनेक शेतकरी शेती व पूरक व्यवसायात वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. दौंड तालुक्यातील पाटस (ठोंबरे वस्ती) येथील बबन सावळाराम ठोंबरे हे त्यापैकीच एक शेतकरी म्हटले पाहिजेत. बीएपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. सुमारे सतरा वर्षे त्यांनी भीमा शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पाटस येथे लिपिक पदावर नोकरी केली. मात्र नोकरीत मर्यादा होत्या. त्यापेक्षा घरच्या शेतीत काहीतरी भरीव काम करून उत्पन्न वाढविण्याची संधी अधिक खुणावत होती. साधारण चार वर्षांपूर्वी ठोंबरे यांनी नोकरीचा राजीनामा दिला. शेतीचा विकास

  • वडील, पत्नी, प्रशांत व सुहास ही दोन मुले असे ठोंबर यांचे कुटुंब आहे. त्यांची चार एकर १५ गुंठे
  • जमीन आहे. व्यावसायिक शेतीचा विचार केला तर त्यादृष्टीने अंमलबजावणीदेखील व्हायला हवी हे ठोंबरे यांनी जाणले. केवळ शेती एके शेती न करता पूरक व्यवसायांची जोड देण्याचे त्यांनी ठरवले.
  • ऊस, कांदा ही परिसरातील मुख्य पिके. मात्र फळपिकांवरच मुख्य भर दिला. डाळिंब व पेरू ही दोन फळपिके व शेळीपालन व पोल्ट्री असे दोन पूरक व्यवसाय याच पायांवर त्यांची शेती आज उभी आहे.
  •      अशी आहे एकात्मीक शेती

  • डाळिंब (भगवा)
  • पेरू (सरदार - लखनौ)
  • ब्रॉयलर कोंबड्यांची पोल्ट्री
  • सिरोही, उस्मानाबादी शेळीपालन
  • सुमारे दोनहजार माशांचे शेततळ्यात पालन
  • पोल्ट्री व्यवसायातील अनुभव ब्राॅयलर कोंबड्यांचे संगोपन करताना एका कंपनीसोबत करार केला आहे. तीन वर्षांपासून या व्यवसायाचा अनुभव आहे. एक दिवस वयाची पिल्ले सुमारे ४२ दिवस वाढवून ती कंपनीला दिली जातात. त्यासाठी किलोमागे पाच रुपये दर कंपनीकडून दिला जातो. सध्या पाच हजार ४०० पक्ष्यांचे शेड आहे. त्यासाठी सुसज्ज शेडची उभारणी नऊ लाख रुपये खर्च करून केली. वर्षातून किमान पाच बॅचेस घेतल्या जातात. मरतूक होऊ नये म्हणून व काळजी म्हणून लहान पक्ष्यांना ‘हीट’ देण्यासाठी डब्यात कोळसा ठेवण्याची पद्धत वापरली जाते. प्रकाशासाठी सात वॉट क्षमतेचे एलईडी बल्ब वापरले आहेत. पक्ष्यांची व्यवस्थित निगा व स्वच्छता ठेवली जाते. लसीकरण, खाद्य ही जबाबदारी कंपनीकडे असते. प्रति बॅच सुमारे ४० ते ५० हजार रुपये उत्पन्न मिळते. अर्थात वीज, मजुरी, पाणी असा खर्चही असतो. मात्र हा व्यवसाय आर्थिक आधार चांगला देतो असा ठोंबरे यांचा अनुभव आहे. डाळिंब डाळिंब तसे ठोंबरे यांचे मुख्य पीक आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी भगवा जातीच्या रोपांची लागवड १३ बाय १० फुटांवर केली. पहिले उत्पादन घेतले, त्या वेळी एकरी पाच टन, त्यानंतर २०१५ मध्ये १० टन, २०१६ मध्ये दुष्काळाच्या झळा सोसत एकरी ८ टन उत्पादन घेतले. मागील वर्षी मात्र बारामती केव्हीकेने मधमाशीपालन विषयातील मार्गदर्शन केले. यात केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सय्यद शाकीर अली व विशेष विशेषज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचा वाट राहिला. एकरी दोन मधपेट्या ठेवल्या. मधमाश्यांमुळे परागीभवनाला चांगली चालना मिळाली. त्यामुळे फळ सेटिंग चांगले झाले. उत्पादन वाढण्यास मदत झाली. एकूण व्यवस्थापन चांगले ठेवल्याने एकरी १४ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. डाळिंबाला गेल्या चार वर्षांत किलोला ४०, ८०, ६० व ४० रुपये असे दर मिळाले आहेत. पेरू डाळिंबाच्या जोडीला सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी पेरूची महात्मा फुले विद्यापीठातून सरदार जातीची रोपे आणली. त्यांची १३ बाय १० फुटांवर लागवड केली आहे. व्यापारी जागेवर येऊन प्रति किलो ३० ते ४० रुपये दराने खरेदी करतात. त्यामुळे विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज भासत नाही. शेततळ्याची उभारणी सिंचनाची साधने म्हणून विहीर, बोअर आहेत. मात्र पाण्याची संरक्षित सोय म्हणून शेततळे घेतले आहे. त्यातूनही पूरक उत्पन्नाचा स्रोत शोधताना कटला जातीच्या माश्यांचे संगोपन सुरू केले आहे. अर्थात, त्याचे हे पहिलेच वर्ष आहे. विविध प्रयोगांमधूनच भांडवलवृद्धी करण्याचा प्रयत्न आहे. ते झाले तरच शेतीत अजून हुरूप वाढेल, असे ठोंबरे सांगतात. संपर्क- बबन ठोंबरे- ९८६०३०९४५४ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

    River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

    Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

    SCROLL FOR NEXT