अवजारांची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी गावात येतात.
अवजारांची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी गावात येतात.  
यशोगाथा

उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या शेतकऱ्यांसारखी

Chandrakant Jadhav

जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बचत गट, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी कंपनी आदी विविध प्रयत्नांतून स्वतःमधील उपक्रमशीलतेला वाव दिला आहे. यांत्रिकीकरण, अवजारे उपलब्धता, बियाणे निर्मिती, बिक्रेटरूपी खतनिर्मिती आदींच्या माध्यमातून शेतीतील खर्च कमी करताना उत्पन्नाचे स्त्रोत विस्तारले आहेत. या उपक्रमांमुळे संघटीतरीत्या विकास घडवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चांगदेव (ता. मुक्ताईनगर) हे तापी नदीच्या काठावर वसलेले गाव. केळी, कपाशी व मका ही पंचक्रोशीतील मुख्य पिके. काळी कसदार जमीन गावच्या शिवारात आहे. केळी बागायतदारांची संख्या गावात अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील शेतकरी स्वस्थ न बसता अत्यंत उपक्रमशील आहेत. केवळ स्वतपुरती प्रगती न करता सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती त्यांच्यात दिसून येते. चांगदेवच्या शेतकऱ्यांचे उपक्रम

  • सन २००७ मध्ये वीर गुर्जर शेतकरी बचत गटाची स्थापना. त्यात गावपरिसरातील ११ शेतकऱ्यांचा सहभाग.
  • गटाने शेती अवजारांची सुविधा प्राधान्याने केली. उद्दीष्ट हेच की सर्व शेतकऱ्यांकडे विविध अवजारे नसतात. एकाच वेळी ती घेणे परवडतही नाही. काहीजण एखाद्या हंगामातच वापर करतात. त्यानंतर ते पडून राहते वा नादुरुस्त होते. आज या अवजारांचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होतो.
  • गटातील सदस्य - गोकुळ पाटील, सदानंद चौधरी, ज्ञानेश्‍वर पाटील, रवींद्र चौधरी, चंदन पाटील, विनायक पाटील, अतुल पाटील, गजानन चौधरी, प्रदीप पाटील, किरण महाजन, सचिन महाजन अवजारांच्या सुविधा

  • बैलजोडी चलित कोळपे, वखर, हरभरा, मका, गहू पेरणी यंत्र, केळीच्या झाडांना माती लावण्याचे अवजार, सायकलचलित कोळपे, ट्रॅक्‍टरचलित अवजारे. त्यात सऱ्या पाडणी यंत्र, केळीची खोडे काढण्यासाठी यू पास, कपाशी काढणीसाठी व्ही पास, कलिंगडासाठी गादीवाफे तयार करणारे यंत्र, जमीन सपाटीकरण तसेच वरंबा तयार करण्यासाठी यंत्र, केळीची खोडे काढून जमीन भुसभुसीत करण्यासाठी यंत्र
  • पाण्याचे दोन टॅंकर (प्रति पाच हजार लिटर क्षमता), प्लॅस्टिकच्या मोठ्या ८० टोपल्या,
  • वीस प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्‍या. लग्न व तत्सम कार्यात स्वयंपाकासंबंधी उपयोगी गॅसचलित शेगड्या.
  • भाडेशुल्क (प्रातिनिधिक)
  • (प्रतिदिन) - बैलजोडीचलित अवजारे- ५० रुपये, टॅंकर ३०० रु., कीडनाशके फवारणी पंप- (संख्या ५०), वीस रुपये प्रति पंप, शेगड्या १०० रु. ट्रॅक्‍टरचलित यंत्रे २०० रु. जमीन भुसभुशीत करणारे यंत्र महाग असल्याने ते एक हजार रुपये दराने दिले जाते.
  • कृषी विभागाकडून अनुदान. साहित्याच्या वापरापोटी जे भाडेशुल्क गटाला मिळते त्याचा उपयोग विकास उपक्रमांवर खर्च करण्याकडे कल
  • स्वखर्चाने निधी संकलन गटातील प्रत्येक सदस्याने २०० रुपये प्रति महिना रक्कम गुंतवली. सहा महिने निधी संकलित करण्याचे काम सतत सुरू होते. सोबत अवजारे वापरापोटी शेतकऱ्यांकडून भाडेशुल्कही येत होते. आजघडीला सुमारे २५ लाख रुपयांची अवजारे या गटाकडे आहेत. कृषी विज्ञान मंडळाचे गोदाम व प्रक्रिया युनिट

  • गट स्थापनेनंतर काही सदस्यांनी पुढाकार घेत श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाची सन २००९ मध्ये स्थापना केली. यात गोकुळ पाटील यांच्यासह अतुल पाटील, रवींद्र चौधरी, किरण महाजन, महेंद्र पाटील, अनिल चौधरी, अतुल चौधरी आदींचा समावेश आहे. मंडळाने ग्रेडिंग प्रक्रिया युनिट उभारले.
  • त्याची किंमत ११ लाख रुपये होती. त्यात साडेपाच लाख रुपये निधी शेतकऱ्यांनी तर उर्वरित
  • शासनाकडून अनुदान घेतले. त्याच मदतीने धान्य साठवणूक गोदामही गावात उभारले.  
  • चांगदेवच्या शेतकऱ्यांचे विशेष उपक्रम

  • बचत गटाद्वारे हरभरा बिजोत्पादन उपक्रम. दरवर्षी सुमारे ३०० क्विंटल बियाण्याची विक्री खासगी कृषी केंद्र व गटामार्फत. कृषी विभागाकडूनही होते खरेदी. ६० रुपये प्रति क्विंटल दराने परिसरातील शेतकऱ्यांना विविध धान्याची स्वच्छता, प्रतवारी प्रक्रिया युनिटद्वारे करून दिली जाते.
  • यांत्रिकीकरण योजनेतून विज्ञान मंडळाकडे ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित अवजारे.
  • विज्ञान मंडळाकडून गावातच युरिया-डीएपी ब्रिकेट निर्मितीचा उपक्रम. यात २.८ ग्रॅम वजानची ब्रिकेट बनविण्याचे तंत्र. केळी उत्पादकांना त्याचा लाभ होतो.
  • ऑस्ट्रेलियातील संशोधकांनीही शेतकरी गट, कृषी विज्ञान मंडळाचे उपक्रम अभ्यासण्यासाठी चांगदेव गावाला भेट दिली आहे. पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राची मदत त्यासाठी झाली.
  • शेतकरी उत्पादक कंपनीची उभारी गट, मंडळ या पुढे आणखी एक पाऊल टाकत सन २०१५ मध्ये संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. यात पाच गावांमध्ये त्याअंतर्गत २५ शेतकरी गट स्थापन केले. प्रति गटात १५ शेतकरी आहेत. एकूण ५३६ शेतकऱ्यांनी पाच लाख १५ हजार रुपयांचे भागभांडवल उभे केले. मका ड्राईंग यंत्रणा शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मका ड्राईंग यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. प्रकल्पाची एकूण किंमत १८ लाख रुपयांची आहे. एक हजार स्क्‍वेअर फुटात गोदाम उभारले आहे. कंपनीतील सदस्य रवींद्र चौधरी यांच्याकडील जागेचाच वापर त्यासाठी होईल. गावात खते, कीडनाशके, पीव्हीसी पाईप्स, लॅटरल्स व किरकोळ साहित्य विक्रीही कंपनीने सुरू केली आहे. संपर्क- गोकुळ पाटील - ९१३०९१५५२५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

    Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

    Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

    Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

    Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

    SCROLL FOR NEXT