पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल
पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल agrowon
यशोगाथा

Berry Market : पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल

गणेश कोरे

सध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागांतून चेकनट, चमेली, उमराण आणि चण्यामण्या बाेरांची आवक सध्या पुणे बाजार समितीमध्ये सुरू आहे. पुणे बाजारासह, कर्डूवाडी जवळील माेडनिंब उपबाजारातही विविध बाेरांच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे. बाेरांच्या उलाढालीचा घेतलेला आढावा.

देशी बोरे आकाराने लहान असली तरी त्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते. त्याची भुरळ पडणार नाही, अशी व्यक्तीच दुर्मिळ. त्यातच संक्रांतीच्या सणाला वाण लुटण्याच्या महिलांच्या सामानांमध्ये बोरे आवश्यक असतात. त्यामुळे या काळात मागणी वाढत जाते. विविध बाेरांचा हंगाम आवक आणि दरांबाबत माहिती देताना बाेरांचे प्रमुख आडते प्रवीण शहा म्हणाले, ‘‘बाेरांचा हंगाम साधारण आॅक्टाेबर ते फेब्रुवारी दरम्यान असताे.

आॅक्टाेबर महिन्यांत तुरळक आवक सुरू होते, पुढे टप्प्याटप्प्याने डिसेंबरमध्ये हंगाम जाेमात येतो. संक्रांतीच्या सणासाठी बाेरांना मागणी वाढत असल्याने दरही साधारण दुपटीने वाढतात. संक्रांतीनंतर हंगाम कमी हाेत फेब्रुवारीअखेर बाेरांच्या हंगामाची सांगता हाेते.

यंदा चांगला झालेला पाऊस, फळ लागणीच्या काळातील ढगाळ वातावरण, तापमानातील चढउतार यामुळे बाेरांचे उत्पादन दुपटीने वाढले असून, आवकदेखील वाढली आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत.’’ हंगाम आवक आणि दरांबाबत

  • हंगाम - आॅक्टाेबर ते फेब्रुवारी

  • आवक हाेणारी प्रमुख गावे - साेलापूर, आष्टी, कानाेरी, माेडलिंब, अनगळ, देवडे

  • आवक हाेणारे प्रमुख वाण - चमेली, उमराण, चेकनट हे महाराष्ट्रातील विविध भागांतून

  • केवळ चण्यामण्या वाणांची आवक ही गुजरात आणि उदयपूर येथून हाेते.

पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल

याप्रकारे हाेते आवक

  • उमराण आणि चमेली या बाेरांची आवक ४५ ते ५० किलाेंच्या गाेण्यांमधून हाेते. हंगामात दररोज सरासरी तीन हजार गाेणींची आवक होते.

  • चेकनेट बोरांच्या एक किलोच्या जाळीच्या पिशव्या भरून, प्रति गोणी ५० पिशव्या बसतात. अशा सुमारे २०० गोणींची आवक प्रति दिन होते.

शेतकरी प्रतिक्रिया

‘‘माझी स्वतःची गावरान बाेरांची ४० झाडे असून, मी परिसरातील १५० झाडे विकत घेतली आहेत. बाेरांचा हंगाम साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासुन सुरु हाेताे. पहिल्या टप्प्यात रोज साधारण १० ते १५ डाग बाजारात आणताे. पुढे डिसेंबरमध्ये दरराेज सुमारे ३० डाग (डाग-४० किलाेची एक गाेण) याप्रमाणे राेज दीड टन माल आणताे.

बाेरांना प्रति किलाे १५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळताे. हाच दर संक्रांतीला ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढतो. सुमारे ४५ दिवसांच्या या एका हंगामात ६० टन बाेरांची विक्री करताे. सरासरी २० रुपये प्रति किलाे दर धरला तरी सुमारे एक लाख २० हजार रुपये मिळतात. यामधून वाहतूक आणि मजुरी वगळता ६० हजार रुपये निव्वळ मिळतात.’’ - गणेश अर्जुन बंड शेतकरी, काेरडगांव, ता. पाथर्डी, जि. नगर. माेडनिंब बाजार स्थिती

  • कुर्डूवाडी बाजार समितीअंतर्गत येणारा माेडनिंब उपबाजार चमेली आणि उमराण बाेरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथील १५ किलाेमीटर परिसरात माेठ्या प्रमाणावर चमेली आणि उमराण बाेरांची लागवड आहे. माेडनिंब उपबाजारातून दिल्लीसह गुजरातमधील सुरत, आनंद, मेहसाना, अहमदाबाद तर राजस्थान मधील उदयपूर, अजमेर, जयपूर, किनवाडा, गाेरपुतली आदी ठिकाणी बाेरे पाठविली जातात. या ठिकाणांवरून व्यापारीही खरेदीसाठी येतात.

  • दिवाळीनंतर बाेरांची आवक सुरू होते. संक्रांतीपर्यंत हंगाम असताे.

  • या बाजार आवारात दरराेज सरासरी ८ ते १० हजार गाेणी बाेरांची आवक हाेते. सध्या प्रति किलाे ४ ते ७ रुपये एवढा दर आहे.

  • यंदा पावसामुळे झाडांच्या वरील भागातील बाेरांवरही भुरी राेगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा खालावला आहे. दर्जेदार बोरांचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यंदा थंडी चांगली पडलेली नाही, त्याचाही फटका बोरांना बसला. अन्यथा बोरांना प्रति किलाे साधारण १० ते १३ रुपये एवढा दर मिळू शकला असता, अशी माहिती माेडनिंब बाजारातील आडते चतुर्भूज जाधव यांनी दिली.

शेतकरी प्रतिक्रिया ‘‘माझी बाेरांची ५०० झाडे असून, सध्या राेज माेडनिंब बाजारात ३० ते ३५ गाेणी बाेरे विक्रीसाठी पाठवित आहे. यंदा गुजरात, राजस्थान येथून मालाला मागणी नसल्याने उठाव नाही. परिणामी प्रति किलाे फक्त ५ ते ६ रुपये दर मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर १० रुपयांपर्यंत हाेता. एकही पट्टी १० रुपयांच्या आत नव्हती. एका गाेणीला मजुरी, हमाली, वाहतुकाची खर्च ९० रुपये असून, एका गाेणी मागे फक्त १५० रुपये मिळत आहे.’’ - दादा ढेकळे, (संपर्क ः ९६२३४१४९७८ ) शेतकरी, ढेकळेवाडी, ता. माेहाेळ, जि. साेलापूर

पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल
पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT