दर्जेदार, एकसारख्या वजनाचे आंबे पिकविण्यासाठी ठेवले आहेत. 
यशोगाथा

ग्राहकांत नाव मिळवलेला शिर्केंचा ‘माउली’ आंबा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये येथील रामचंद्र शिर्के यांनी सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर अधिकाधिक भर देत देवगड हापूस आंबा उत्पादनाचा माउली ब्रॅण्ड तयार केला आहे. व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहक विक्रीवर अधिक भर देत त्यांनी आपल्या दर्जेदार आंब्यासाठी बाजारपेठ व्यवस्थाही तयार केली आहे.

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये येथील रामचंद्र शिर्के यांनी सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर अधिकाधिक भर देत देवगड हापूस आंबा उत्पादनाचा माउली ब्रॅण्ड तयार केला आहे. व्यापाऱ्यांपेक्षा थेट ग्राहक विक्रीवर अधिक भर देत त्यांनी आपल्या दर्जेदार आंब्यासाठी बाजारपेठ व्यवस्थाही तयार केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात तळेरे-विजयदुर्ग या राज्यमार्गावर गिर्ये गाव आहे. जागतिक दर्जाचा देवगड हापूस आंबा हेच या भागातील मुख्य पीक आहे. पुरातन पेशवेकालीन रामेश्‍वर मंदिरही याच गावात आहे. औष्णिक प्रकल्पाला टोकाचा विरोध केल्यामुळे हे गाव राज्यात चांगलेच चर्चेत आले. याच गावात रामचंद्र शिर्के राहतात. त्यांचा जन्म, शिक्षण मुंबईत झाले. परंतु १९९० मध्ये ते आपल्या मूळगावी परतले. आंब्याची वडिलोपार्जित झाडे होती. अन्य आंबा उत्पादकांप्रमाणे तेही त्यातून उत्पादन घेऊ लागले. सुरुवातीला रासायनिक शेतीपद्धतीवरच भर होता. मात्र रसायनांच्या असंतुलित वापराबाबत ते अधिक जागरूक झाले. या पिकाच्या व्यवस्थापनासंबंधी अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवादांना उपस्थित राहू लागले. त्यातून बारकावे समजत गेले. सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता देवगड येथील गोगटे विद्यालयातील प्रशिक्षणात कर्नाटक येथील तज्ज्ञ डॉ. एडवर्ड यांनी रासायनिक आणि सेंद्रिय आंबा उत्पादनातील फरक, फळात साका होण्याची समस्या या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा प्रभाव शिर्के यांच्यावर पडला. त्यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर कमीत कमी ठेवून सेंद्रिय पद्धतीवर जास्तीतजास्त भर देण्याचा निर्णय घेतला. सुमारे ११ वर्षांपूर्वी या बदलास सुरुवात केली. आज ते ९० टक्के सेंद्रिय व १० टक्के किंवा आत्यंतिक गरज भासेल तेव्हाच रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात. सेंद्रिय खते, वनस्पतिजन्य अर्क, जिवामृत बनविण्याचे प्रशिक्षण वा मार्गदर्शनही शिर्के यांनी शेतकरी व तज्ज्ञांकडून घेतले आहे. शिर्के यांच्या आंबा शेतीची वैशिष्ट्ये

  • सहा एकर शेती. दोन एकरांत हापूसची सुमारे १२५ झाडे.
  • अन्य शेतकऱ्यांची ४२५ झाडे कराराने घेतली आहेत.
  • दीडशे वर्षांची तसेच २०, ५०, १०० वर्षे वयाची विविध झाडे
  • सेंद्रिय खताची निर्मिती सेंद्रिय खतनिर्मितीसाठी १६ फूट लांब, १० फूट रुंद व साडेचार फूट खोलीचा खड्डा पोकलेन यंत्राद्वारे खोदण्यात येतो. डिसेंबर किंवा जानेवारीत निर्मिती प्रकिया सुरू होते. एक ट्रक शेणखत किंवा लेंडीखत, मळी, मच्छी कुटी किंवा कोंबडीखत यापैकी एका घटकाचा आळीपाळीने वापर होतो. या घटकाचे एकेक फूट जाडीचे साडेचार फुटांपर्यंत थर लावले जातात. खड्डा भरून झाल्यानंतर पाणी झिरपण्यासाठी लहान छिद्रे केली जातात. मार्चच्या दरम्यान पाणी दिले जाते. मेच्या पहिल्या आठवड्यात खत बाहेर काढून सुकवून पिशवीत भरले जाते. जूनच्या दरम्यान झाडाच्या वयानुसार प्रति झाड १० किलो, २५ ते ५० किलोपर्यंत त्याचा वापर होतो. वर्षभरात सुमारे चार ते पाच टन एकूण निर्मिती होते. अन्य निविष्ठा कडुनिंबाची काही झाडे आहेत. शिवाय काही शेतकऱ्यांकडूनही पाला खरेदी होतो. त्यासह काजरा, लसूण, आले आदींचा अर्कही कीडनाशक म्हणून वापर होतो. तणनाशकांचा वापर केला जात नाही. तणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर ‘ग्रासकटर’च्या साह्याने ते कापले जाते. त्यावर जिवामृत शिंपडून बागेत ठेवले जाते. जिवामृतासाठी शेण व देशी गोमूत्र शेतकऱ्यांकडून घेतले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. विक्री व्यवस्था शिर्के पूर्वी मध्यस्थांना विक्री करायचे. मात्र फसवणूक होत असल्याने थेट विक्रीला अधिक पसंती दिली. यात व्यापाऱ्यांना थोडा व थेट ग्राहक व विविध महोत्सवातील स्टॉल्समध्ये अधिकाधिक यानुसार दरवर्षी सरासरी दीडहजार पेट्यांची विक्री होते. चार ते सहा डझनाची पेटी असते. प्रति पेटी सरासरी अडीचहजार व त्याआसपास दर मिळतो. सहा डझनाच्या पेटीत सुमारे २५० ग्रॅमचे फळ बसते. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर असल्याने ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. मुंबई ,पुणे, बीड, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी शिर्के यांनी बाजारपेठ तयार केली आहे. पणन विभागाकडेही नोंदणी केली आहे. थेट विक्रीमध्ये काही वेळा वाहन वेळेत उपलब्ध होत नसे. वाहतुकीवरही खर्च अधिक व्हायचा. हा विचार करून टेम्पो खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. शिर्के दर्जाशी तडजोड करीत नाहीत. ग्राहकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देता कामा नये असे त्यांचे मत आहे. म्हणूनच आंब्याच्या ‘माउली’ ब्रँडची ओळख तयार करणे त्यांना शक्य झाले. सेंद्रिय पद्धतीमुळे पडला फरक रासायनिक पद्धतीने उत्पादन घेताना मोहोर मोठ्या प्रमाणात यायचा. परंतु प्रत्यक्षात फळधारणा कमी व्हायची. फळगळ होणे, आंब्यात साक्याचे अधिक प्रमाण असे प्रकार व्हायचे. काही फळे मोठी तर काही अगदी लहान राहायची. त्यामुळे विक्री करताना दमछाक व्हायची. सेंद्रिय व्यवस्थापनाचा वापर सुरू केल्यानंतर समस्यांची तीव्रता कमी झाली. खर्चातही घट झाली. फळांची गुणवत्ता, रंग, आकार व स्वादात चांगला फरक दिसून आल्याचे शिर्के सांगतात. साक्याचे प्रमाणही ५० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आले. संपर्क : रामचंद्र शिर्के, ९७६५४६०३२४, ९३०९५९४६६८

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

    Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

    Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

    Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

    Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

    SCROLL FOR NEXT