Work Business Agrowon
यशोगाथा

Burud work business : बुरूड व्यवसायाच्या उत्पन्नातून मिळाला आधार

Ramai Self Help Group : बुरूड कामाच्या व्यवसायाला आता वेगळी प्रतिष्ठा मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा-नाणिज येथील माता रमाई स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून चिव्याच्या टोपल्या, सुपं, रोवळ्या विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना उत्पन्नासह कुटुंबालाही आधार मिळाला आहे.

राजेश कळंबटे

Burud Work : बुरूड कामाच्या व्यवसायाला आता वेगळी प्रतिष्ठा मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा-नाणिज येथील माता रमाई स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून चिव्याच्या टोपल्या, सुपं, रोवळ्या विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना उत्पन्नासह कुटुंबालाही आधार मिळाला आहे. यामुळे रमाई स्वयंसाह्यता समूह अनेकांना आधार ठरत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावांत बुरूड कामाच्या व्यवसायाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा-नाणिज येथील उन्नती प्रभाग संघातील माता रमाई स्वयंसाह्यता समूहातून काम करताना चिव्याच्या टोपल्या, सुपं, रोवळ्या, फुलांच्या परड्या यांच्या विक्रीतून माधवी महेंद्र कांबळे यांनी स्वतःचे कुटुंब सांभाळत चार मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. बुरूड कामाच्या व्यावसायामधून दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्नही मिळत असून, रमाई स्वयंसाह्यता समूह अनेकांना आधार ठरत आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील किरबेट येथील माधवी यांना लहानपणापासून बुरूड कामाची आवड होती. पंचायत समितीच्या माध्यमातून गावातच स्थापन केलेल्या महिला गटात त्या सक्रिय होत्या. त्यांचा विवाह नाणिज येथील महेंद्र कांबळे यांच्याशी झाला. सासरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बुरूड काम सुरू केले. पती महेंद्रही गावातच मोलमजुरी करायचे.

मुलांचे शिक्षण आणि वाढती महागाई लक्षात घेता पैशाची चणचण जाणवायची. हातात कला असल्यामुळे हा व्यावसाय वाढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण गुंतवणुकीसाठी पैसे नसल्यामुळे वस्तूंसाठीचे साहित्य आणता येत नव्हते. त्यासाठी माधुरी यांनी १ जानेवारी २०१६ ला उमेद अभियानांतर्गत रमाई स्वयंसाह्यता समूहाची स्थापना केली. त्या गटाच्या अध्यक्षा झाल्या. गावातील दहा महिला गटात सहभागी झाल्या.

बचत गटांना मिळणाऱ्या शासनाकडील अनुदानाचा उपयोग त्यांनी कच्चा माल म्हणजेच बांबू खरेदीसाठी करण्यास सुरुवात केला. साधारणपणे त्यांना वर्षाला एक ते दीड हजार बांबूंची आवश्‍यकता असते. एक बांबू सध्या १०० रुपयांना मिळतो. संगमेश्‍वर तालुक्यात दाभोळ, साखरपा येथून आणावा लागतो. बांबू तासून त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून त्यापासून सुपलं, रोवळी, आकर्षक टोपल्या बनविल्या जातात. एक सुप २५० रुपयांना विकले जाते.

कोंबड्या ठेवण्यासाठीच्या टोपल्यांना अधिक किंमत असते. बाजारात मागणी असल्याने फुलांच्या आकर्षक परड्याही बनवतात. तयार केलेल्या वस्तू हातखंबा, नाणिज, पाली येथील आठवडा बाजारात विक्री केल्या जातात. आठवड्याला दोन ते अडीच हजार रुपयांचा फायदा होतो. सुरुवातीला गटाने १ लाख रुपये उचलले होते.

त्यानंतर वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर योजनेतून ७० हजार रुपये आणि बँक ऑफ इंडियाच्या पाली शाखेमधून ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. गेली अनेक वर्षे त्या बुरूड कामाच्या व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. यामध्ये त्यांना उमेदचे अधिकारी प्रणय कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

बचत गट :

माधुरी कांबळे (अध्यक्ष), रवीना कांबळे (सचिव), अनिता कांबळे (कोशाध्यक्ष), रंजीता कांबळे, शारदा कांबळे, शारदा शांताराम कांबळे, संजना कांबळे, नंदा कांबळे, सुलोचना पंडित, सायली तोडणकर (सर्व सदस्य).

बुरूड कामाची लहानपणापासून आवड होती. त्याचा फायदा आम्हाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी झाला आहे. तसेच बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलांनाही व्यावसाय करता येत आहे. गटामुळे व्यावसाय वृद्धी करता आली आणि फायदाही झाला.
- माधवी कांबळे, ८७६७६७८६७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT