Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात ८ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट; तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार

Rain Update In Maharashtra : राज्यात किमान आणि कमाल तापमानात चढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. देशात मागील चोवीस तासात सौराष्ट्रातील कंदला येथे उच्चांकी ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

Dhananjay Sanap

Maharashtra yellow alert: राज्यात सूर्याचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. राज्यात मागील चोवीस तासात नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील कमाल तापमानाचा पारा उच्चांकी ४५.३ अंश सेल्सियसवर पोहचला. तर त्याखालोखाल जळगाव आणि अकोला येथे ४३.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तसेच राज्यात सूर्य आग ओकत असताना वादळी पावसालाही पोषक हवामान झालं आहे. 

आज राज्यातील ८ जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी वीजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर ३ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज वादळी वारे, वीजा आणि ढगांच्या गडगडासह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच उकाड्यात वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी तुरळक ठिकाणी हजेरी लावण्याचा अंदाज आहे.  

राज्यात किमान आणि कमाल तापमानात चढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. देशात मागील चोवीस तासात सौराष्ट्रातील कंदला येथे उच्चांकी ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र चक्राकार वाऱ्यासह सकाळी ८.३० पर्यंत सक्रिय होतं. पुढील २४ तासात ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून मध्य बंगालच्या उपसागरात हळूहळू निवळण्याची शक्यता  हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT