Rain Agrowon
हवामान

Rain in Maharashtra : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात पावसाचा 'येलो अलर्ट'  

Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

Dhananjay Sanap

Pune News : उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे. तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. त्यातच राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीनं जोर धरलेला आहे. 

आज राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ ते २ अंश सेल्सियसनं घटण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान पुढील २ दिवसांनंतर २ ते ३ अंश सेल्सियसनं कमी होण्याचा अंदाज आहे. राज्यात नाशिक नीचांकी १३.२ अंश सेल्सियसची नोंद झाली. तर देशात छत्तीसगड येथील अंबिकापुरला १०.४ अंश सेल्सियसची नोंद झाली.  

दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर लक्षद्वीपजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर उत्तर भारतात पुढील पाच दिवसात किमान तापमानाचा पारा २ ते ३ अंश सेल्सियसनं घसरण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये पहाटे आणि रात्री दाट धुक्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT