Hailstorm Alert Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात गारपिटीची शक्यता

Hailstorm Alert : राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज (ता. १२) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज (ता. १२) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाड्यापासून उत्तर अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे.

|रविवारी (ता.११) पश्चिम बंगालमधील कालीकुंदा येथे देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील मुंबई, रत्नागिरी, विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, अकोला, भंडारा व यवतमाळ येथे ४० अंशांपेक्षा अधिक, ‎जळगाव, परभणी, नागपूर आणि ‎वर्धा येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎जेऊर, ‎सोलापूर, ‎धाराशिव, ‎चंद्रपूर, ‎गोंदिया आणि ‎वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १२) कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे आहे.

अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल

अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून, नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक स्थिती झाली आहे. उद्यापर्यंत (ता. १३) अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे.

‎सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३५.४---२२.३

‎‎धुळे---३६.०---१९.६

‎जळगाव---३९.५---२७.०

‎जेऊर---३८.०---२२.५

‎कोल्हापूर---३४.८---२३.४

‎महाबळेश्वर---२८.५---१८.१

‎मालेगाव---३७.८---२२.२

‎नाशिक---३३.५---२२.५

‎निफाड---३३.८---१९.३

‎सांगली---३५.५---२३.८

‎सातारा---३६.२---२२.०

‎सोलापूर---३८.९---२६.६

‎सांताक्रूझ---३३.५---२५.३

डहाणू---३४.३---२५.५

‎रत्नागिरी---३४.४---२५.८

‎छत्रपती संभाजीनगर---३७.४---२६.२

‎धाराशिव---३८.१---२३.३

‎परभणी---३९.४---२७.०

‎परभणी (कृषी)---३८.७---२६.४

‎अकोला---४०.६---२७.२

अमरावती---४१.४---२६.३

‎‎भंडारा---४०.०---२२.०

‎बुलढाणा---३६.६---२५.५

‎ब्रह्मपुरी---४१.१---२६.३

‎चंद्रपूर---३८.६---२६.८

‎गडचिरोली---३७.६---२४.४

‎गोंदिया---३८.७---२६.८

‎नागपूर---३९.६---२६.०

‎वर्धा---३९.५---२६.६

‎वाशीम---३८.२---निरंक

‎यवतमाळ---४०.०---२६.०

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग---किमान---कमाल

‎विदर्भ---२२.०---४१.४

‎मराठवाडा---२३.३---३९.४

‎पश्‍चिम महाराष्ट्र---१८.१---३८.९

‎उत्तर महाराष्ट्र---१९.३---३९.५

‎कोकण---२५.०---३४.४

वादळी पाऊस गारपिटीची शक्यता (येलो अलर्ट) :

सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT