Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उद्या काही भागात पावसाचा अंदाज; तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट

Weather forecast : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी कमी झाली. तर काही भागात ढगाळ वातावरण होते.

Anil Jadhao 

Weather report : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी कमी झाली. तर काही भागात ढगाळ वातावरण होते. मात्र उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने उद्या म्हणजेच गुरुवारी काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदूर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारेही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा, मराठवड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर शुक्रवारपासून पावसाचे प्रमाण आणि जोर काहीसा वाढू शकतो. शुक्रवारपासून सोमवारपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT