Maharashtra Weather Update agrowon
हवामान

Maharashtra Weather: थंडीचा जोर वाढणार; तापमानात चढ-उतारांची शक्यता

Cold Weather Update : राज्यातील थंडीमध्ये काही प्रमाणात चढ उतार दिसत आहेत. तर राज्यातील तापमानाचा पारा आता १० अंशांच्याही पुढे गेलेला आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील थंडीमध्ये काही प्रमाणात चढ उतार दिसत आहेत. तर राज्यातील तापमानाचा पारा आता १० अंशांच्याही पुढे गेलेला आहे. राज्यातील गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. तर तापमानात पुढील काही दिवस काहीसे चढ उतारही राहतील, असा अंदाज आहे.

उत्तर भारतातही थंडी कमी जास्त होत आहे. पण अनेक भागात सकाळी दाट धुके जाणवत आहे. आज पंजाबमधील अमृतसर येथे देशातील सपाट भुभागावरील सर्वात कमी ४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर भारतात १४० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत येत आहेत. त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, जमिनीलगत दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे.

राज्यातील अनेक भागात थंडी काहीशी कमी झालेली आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. तर राज्यातील किमान तापमान १० अंशाच्या पुढे सरकले आहे.

आजही किमान तापमानात बहुतांशी ठिकाणी वाढ झाली होती. पण उद्यापासून राज्यातील थंडी पुन्हा वाढायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. मात्र किमान तापमानातही चढ उतार सुरुच राहतील, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT