Maharashtra Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यातील थंडीच कमीच राहणार ; बहुतांशी भागात तापमानातील चढ उतार कायम

Weather Forecast: उत्तर भारतात थंडीमध्ये काहीसे चढ उतार होत असले तरी थंडीचा कडाका जाणवत आहे. राज्यात मात्र उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाल्याने आणि ढगाळ वाहमान यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News: उत्तर भारतात थंडीमध्ये काहीसे चढ उतार होत असले तरी थंडीचा कडाका जाणवत आहे. राज्यात मात्र उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाल्याने आणि ढगाळ वाहमान यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवत आहे. राज्यातील थंडीचे प्रमाण काहीसे कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात जानेवारीपासूनच थंडीचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहीले आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने ऐन थंडीत उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशावर आहेत. जेऊर आणि उदगीर येथे आज ३५ अंशाची नोंद झाली. तर सोलापूर येथे ३६ अंशावर तापमान पोचले होते.

तर किमान तापमान आजही सरासरीपेक्षा जास्तच होते. आज निफाय येथील गहू संशोधन केंद्रात १२.६ अंशाची नोंद झाली होती. तर इतर ठिकाणी तापमान १३ अंशाच्याही पुढे होते. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कमी आणि उष्णता अधिक, अशी परिस्थिती दिसत आहे.

उत्तर भारतातही थंडीमध्ये चढ उतार सुरुच आहेत. पण थंडी कायम आहे. आज राजस्थानमधील गंगानगर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT