Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात गारवा वाढला! तापमानात मोठी घट, जाणून घ्या सध्याची स्थिती

Temperature Drop: राज्यात थंडीचा प्रभाव वाढत असून अनेक भागांमध्ये तापमान घटले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवामानात गारवा जाणवत आहे. कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यात कालपासून तापमानात मोठी घट झाली. सकाळी हवेतील गारवा चांगलाच वाढला. राज्यातील बहुतांशी भागात सकाळच्या किमान तापमान कमी झाल्याने थंडी जाणवली. दिवसाचे तापमानही काहीसे कमी झाले. 

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र तापमानातील चढ उतार कायम राहतील तसेच कोकणात पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातून थंडी वाऱ्याचे प्रवाह राज्यात कालपासून येत आहे. या प्रवाहांमुळे राज्यातील किमान तापमान कमी झाले. त्यामुळे सकाळी हवेतील गारवा वाढला. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी भागात गारवा काहीसा अधिक होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाी. तर धुळे येथे ७.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

परभणी येथील कृषी महाविद्यालयातही ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे तापमानात लक्षणीय घट झाली होती.

दिवसाच्या कमाल तापमानातही घट पाहायला मिळाली. राज्यात कमाल तापमानातही घट झाली. सोलापुरात राज्यातील सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील इतर भागांमध्ये कमाल तापमानातही घट झाली होती. हवामान विभागाने राज्यातील तापमानात चढ उतार राहतील,  असा अंदाज दिला. 

तसेच कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT