Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : राज्यात थंडीचा कडाका कमीच; अनेक भागात किमान तापमानातील वाढ कायम

Maharashtra Winter Weather : राज्यात थंडीचा कडाका कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक भागांमध्ये किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे थंड हवामानाचा अनुभव मर्यादित होत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील थंडी कमीच असून वातावरणात काहीशी वाढ झालेली आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली. राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसत आहे.

दुपारी काहीसा उकाडाही जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. अनेक भागात मागील २४ तासांमध्ये थंडी वाढली होती. तर अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर सकाळी पाहायला मिळत आहे. उत्तरेतील बहुतांशी भागात थंड टिकून आहे.

आज पंजाबमधील पठाणकोट येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. उत्तर भारतात १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. 

राज्यात किमान तापमानात झालेली वाढ कायम आहे. अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्याचा परिणाम थंडीवर झाला. थंडीचा कडाका बहुतांशी ठिकाणी कमी आहे. दुपारी कडक उन्हामुळे काहीसा उकाडाही जाणवत आहे. आजही हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी अगदी किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT