Weather Agrowon
हवामान

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

APEC Weather Forecast : अपेक हवामान केंद्राने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ला निना निर्माण होण्याची ६२ टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Anil Jadhao 

Pune News : ला निना परिस्थिती निर्माण होणार याची चर्चा मागील काही महिन्यांपासून जोर धरत आहे. आता अपेक हवामान केंद्राने डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ला निना निर्माण होण्याची ६२ टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

अपेक हवामान केंद्राने म्हटले आहे की, एपीसीसी एन्सो स्थिती ला निनाची शक्यता दर्शवित आहे. निनो ३.४ इंडेक्स जानेवारी २०२५ मध्ये उणे ०.८ सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. ही स्थिती वाढत जाऊन मे २०२५ पर्यंत उणे ०.३ सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाच्या मते, इंडेक्स उणे ०.८ सेल्सिअसपर्यंत खाली येईल तेव्हा स्थिती ला निना पातळीवर येईल. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मेटेराॅलाॅजीच्या अंदाजानुसार ला निना स्थिती फेब्रुवारी २०२५ च्या आधीच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरनेही ला निनाविषयी अंदाज दिला आहे. क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला निना निर्माण होण्याची शक्यता ५७ टक्के आहे. तर जानेवारी ते मार्च २०२५ च्या दरम्यान ही स्थिती कायम राहू शकते. 

एपीसीसीने डिसेंबरमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिला आहे. पूर्व हिंद महासागरात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असतानाही हा अंदाज देण्यात आला आहे. तसेच जगातील बहुतेक भागात डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT