Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : पाऊस नेमका कुठे पडणार ? राज्यातील काही भागात गारपीटीचाही इशारा

Weather Update : हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सध्या ऊन, पाऊस आणि उकाडा अशी परिस्थिती दिसून येत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. 

आज सोलापूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला. तर नांदेड,  धाराशिव, लातूर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या म्हणजेच रविवारी विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. यासोबतच खानदेशसह नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली भागातही पावसाचा अंदाज देण्यात आला. 

सोमवारी हवामान विभागाने विदर्भातील वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील इतर जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

मंगळवारी चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटीचा अंदाज दिला. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT