Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain: पुढील पाच दिवस हवामान कसे राहील? देशात कोणत्या भागात पाऊस पडतोय?

Weather Update : पुढील सात दिवस दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Team Agrowon

Rain Update : राज्यात सध्या वातावरणात थंडी वाढत आहे. तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. तर दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.

राज्यात सध्या सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. अनेक भागात थंडी वाढल्याचे दिसते. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. पण आज पावसाची नोंद नव्हती. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. शनिवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. पण जोरदार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

श्रीलंका आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. पश्चिमी विक्षोप समुद्रपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागराकडून दक्षिण भारताकडे जोराचे वारे वाहत आहेत. या कारणांमुळे पुढील सात दिवस दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. तमिळनाडू आणि करेळच्या काही भागात पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. तर कर्नाटकच्या दक्षिण भागात ३ आणि ५ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT