Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain: आज पावसाची काय स्थिती राहील? राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात

Weather Forcast : राज्याच्या काही भागात काल म्हणजेच शुक्रवारी पावसाने चांगली हजेरी लावली. आज सकाळीही काही भागात ढगाळ वातावरण होते. आज काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

अनिल जाधव

Pune News : राज्याच्या काही भागात काल म्हणजेच शुक्रवारी पावसाने चांगली हजेरी लावली. पण बहुतांशी भागात पाऊस नव्हता. आज सकाळीही काही भागात ढगाळ वातावरण होते. आज काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

काल राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आज आपल्या भागात पाऊस पडेल, याची वाट शेतकरी पाहत होते. पण आज सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता.

सकाळी हवेतील गारवादेखील वाढला आहे. तर हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला. तर यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज दिला. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, अशी शक्यताही वर्तविली.

राज्याच्या काही भागात काल म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली होती. रात्रीही काही भागात पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगल्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. तर राज्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. पण आज दुपारी बहुतांशी भागात उन्हाचा चटका पुन्हा वाढला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT