Winter Season Agrowon
हवामान

Winter Update: किमान तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Winter Forecast: आज (ता. २८) राज्यात आकाश निरभ्र राहून, किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News: किमान तापमानाचा पारा १० अंशांपार गेल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. कमाल तापमानातील वाढीमुळे उकाडा वाढला आहे. आज (ता. २८) राज्यात आकाश निरभ्र राहून, किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा (ईशान्य मॉन्सून) हंगाम सोमवारी (ता. २७) संपुष्टात आला. वायव्य भारतात १५० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत कायम आहेत. उत्तर भारतातही थंडीचा कडाका वाढल्याने सोमवारी (ता. २७) राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात पहाटे गारठा, धुक्याची चादर कायम असली तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. कडाक्याची थंडी गायब असतानाच कमाल तापमान ३३ अंशांपार गेले आहे. सोमवारी (ता. २७) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांच्या वर गेला आहे. आज (ता. २८) राज्यात आकाश निरभ्र राहून, किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३३.८---१३.९

अहिल्यानगर---३४.१---१२.४

धुळे---३२.५---११.२

जळगाव---३१.४---१५.०

जेऊर---३५.५---१४.५

कोल्हापूर---३३.०---१८.१

महाबळेश्वर---२९.२---१६.६

मालेगाव---२९.२---१६.०

नाशिक---३३.७---१४.७

निफाड---३१.३---१२.०

सांगली---३४.५---१५.५

सातारा---३४.३---१४.२

सोलापूर---३५.३---१८.२

सांताक्रूझ---३५.०---२०.२

डहाणू---२८.०---१९.१

रत्नागिरी---३६.५---१९.०

छत्रपती संभाजीनगर---३३.६---१६.४

धाराशिव---३१.८---१४.८

परभणी---३३.६---१५.७

परभणी (कृषी)---३२.६---११.४

अकोला---३५.०---१६.३

अमरावती---३३.६---१६.३

भंडारा---३१.८---१५.०

बुलडाणा---३४.०---१७.०

ब्रह्मपुरी---३४.२---१४.५

चंद्रपूर---३२.०---निरंक

गडचिरोली---३२.०---१४.८

गोंदिया---३०.२---१५.०

नागपूर---३२.०---१४.१

वर्धा---३२.२---१५.२

वाशीम---३४.६---१९.०

यवतमाळ---३३.७---१७.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT