Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा!

Pre Monsoon Rain : राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचा जोर वाढला असून कोकण व घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तळकोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात ‘ऑरेंज अलर्ट’ तर इतर भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसाचा धडाका सुरूच आहे. आज (ता. २०) जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने तळ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा दिला आहे. सकाळी उन्हाचा चटका आणि दुपारनंतर जोरदार वादळी पाऊस या स्वरूपाने पडणाऱ्या पावसामुळे उकाडा आणि तापमानात चढ-उतार सुरू आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, जालना, तसेच विदर्भातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. ‎चंद्रपूर, जळगाव, ‎नागपूर येथे ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक, ‎अकोला, ‎वर्धा, ‎गडचिरोली, ‎यवतमाळ, ‎धुळे येथे ३९ अंशांपेक्षा अधिक, अमरावती, ‎वाशीम ३८ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानातील घट कायम आहे.

आज (ता. २०) जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने तळकोकण सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

‎सोमवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३४.८---२४.०

अहिल्यानगर---३२.८---२२.४

‎‎धुळे---३९.०---१९.५

जळगाव---४०.२---२५.७

‎जेऊर---३४.५---२२.५

कोल्हापूर---३३.१---२१.८

‎महाबळेश्वर---२६.३---१८.५

‎मालेगाव---३५.४---२२.२

‎नाशिक---३३.२---२४.७

‎निफाड---३४.६---२३.८

‎सांगली---३३.३---२१.८

‎सातारा---३३.३---२१.८

‎सोलापूर---३६.८---२४.४

सांताक्रूझ---३४.२---२६.०

डहाणू---३६.०---२७.७

‎रत्नागिरी---३४.३---२४.६

‎छत्रपती संभाजीनगर---३३.०---२४.०

‎धाराशिव---३६.२---२०.०

‎परभणी---३७.१---२४.५

‎परभणी (कृषी)---३४.८---२३.९

अकोला---३९.८---२६.६

अमरावती---३८.४---२६.७

‎‎‎बुलढाणा---३५.४---२५.०

‎ब्रह्मपुरी---४१.२---२७.९

‎चंद्रपूर---४१.०---२६.६

‎गडचिरोली---३९.२---२५.०

गोंदिया---३७.६---२५.८

‎नागपूर---४०.८---२८.३

‎वर्धा---३९.५---२८.२

‎वाशीम---३८.०---निरंक

‎यवतमाळ---३९.०---२५.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT