Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : नव्या वर्षात गुलाबी थंडीची प्रतीक्षा

Maharashtra Weather Forecast : राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी असलेले धुक्याचे साम्राज्य, तसेच अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी असलेले धुक्याचे साम्राज्य, तसेच अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. दुपारच्या वेळी उकाड्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. आज (ता. १) विदर्भासह राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे नववर्षात गुलाबी थंडीसाठी आणखी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. मंगळवारी (ता. ३१) राजस्थानच्या उत्तरलाई येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाळी वातावरणामुळे राज्यात थंडी कमी झाली असून, अनेक ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत दाट धुके पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता. ३१) धुळे येथील कृषी महाविद्यालयात येथे नीचांकी १३.२ अंश तापमान नोंदले गेले.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १) विदर्भासह राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात घट झाली तरी थंडीसाठी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मंगळवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१५.४), अहिल्यानगर ३०.९ (१५.५), धुळे २८.५ (१३.२), जळगाव २८.२ (१५.९), जेऊर ३३ (१६.५), कोल्हापूर ३१.१ (१८.२), महाबळेश्‍वर २५.२ (१५), मालेगाव २७.२ (१८), नाशिक २९.७ (१६.६), निफाड २८.५ (१४.५), सांगली ३२.२ (१८.५),

सातारा ३१.७ (१६.९), सोलापूर ३४ (१८.६), सांताक्रूझ ३४.५ (२०.३), डहाणू २८.२ (१९.९), रत्नागिरी ३५.४ (२१.७), छत्रपती संभाजीनगर २९.८ (१७.४), धाराशिव ३०.१ (१६.१), परभणी ३०.५ (१८.०), परभणी कृषी विद्यापीठ ३०.७ (१४.८), अकोला ३०.३ (१८.६), अमरावती ३० (१६.८), भंडारा २८ (१५.६), बुलडाणा २७ (१८.४), ब्रह्मपुरी ३१.२ (१६.१), चंद्रपूर ३१, गडचिरोली ३० (१७), गोंदिया २८.१ (१३.५), नागपूर २९.१ (१६.४), वर्धा २९.१ (१७.४), वाशीम ३०.८ (२०), यवतमाळ २९.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT