Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस शक्य

Rain Alert : आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून छत्तीसगड, विदर्भ ते तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे.

आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून छत्तीसगड, विदर्भ ते तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या काही भागात अंशतः ढगाळ आकाश आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. ढगाळ हवामान वाहणारे वारे यामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी उन्हाचा चटका कायम आहे.

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वाशीम येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तर मालेगाव, सोलापूर, अकोला, जेऊर आणि भंडारा येथे ४० अंशांपेक्षा अधिक अधिक तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान झाल्याने, तसेच जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे.

आज (ता. १४) मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३७.७---२१.४

अहिल्यानगर---निरंक---निरंक

धुळे---३९.०---२०.०

जळगाव---३८.५---२३.६

जेऊर---४०.०---१९.०

कोल्हापूर---३५.८---२१.४

महाबळेश्वर---३०.३---१८.५

मालेगाव---४०.६---२३.०

नाशिक---३५.४---२०.५

निफाड---३७.०---१८.५

सांगली---३७.६---२१.३

सातारा---३७.२---१८.०

सोलापूर---४०.२---२५.६

सांताक्रूझ---३३.५---२४.४

डहाणू---३३.०---२३.८

रत्नागिरी---३३.०---२३.८

छत्रपती संभाजीनगर---४१.४---२४.६

धाराशिव---३८.९---२३.२

परभणी---३९.५---२३.५

परभणी (कृषी)---३८.४---१८.०

अकोला---४०.२---२६.६

अमरावती---३९.६---२४.१

भंडारा---४०.०---२३.०

बुलडाणा---३८.६---२५.०

चंद्रपूर---४२.६---निरंक

गडचिरोली---३९.६---२२.०

गोंदिया---३९.६---२१.५

नागपूर---४१.१---२२.०

वर्धा---३९.८---२३.५

वाशीम---४१.०---निरंक

यवतमाळ---३९.५---२५.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२१.५---४२.६

मराठवाडा---१८.०---४१.४

पश्‍चिम महाराष्ट्र---१८.०---४०.२

उत्तर महाराष्ट्र---१८.५---४०.६

कोकण---२३.८---३४.९

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT