Rain Agrowon
हवामान

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचे सावट कायम; राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढला. तर काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे. आज अकोला येथे सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज दिला.

कोल्हापूर, सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात पुढील ४ दिवस म्हणजेच सोमवारपर्यंत ढगाळ हवामानासह काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवारी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.

बीड जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारी लातूर जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी, धाराशिव जिल्ह्यात उद्यापासून सोमवारपर्यंत विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील काही भागात ढगाळ हवामानाचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील अनेक भागात तापमानात देखील वाढ झाली. त्यामुळे उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भात उन्हाचा चटका तुलनेत अधिक होता. अकोल्यात आज ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील हे सर्वाधिक तापमान होते. ब्रम्हपुरी येथे ४१.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT