Rain Update Agrowon
हवामान

Rain Update In Nagar : नगरसह अनेक भागांत जोरदार अवकाळी पाऊस

नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत काल शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने झोडपले.

Team Agrowon

Nagar Rain News : नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत काल शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने झोडपले. सावेडी, केडगाव उपनगरांत गारांसह पाऊस कोसळला. सायंकाळी चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली.

त्यानंतर सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

नगर शहरासह जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांचे आदेश दिले.

मात्र शासकीय सुट्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अद्याप हे पंचनामे झालेले नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाईचा एकही रुपया पडलेला नाही.

आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह नगरकरांना गारपिटीला तोंड द्यावे लागले. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील वीरगावमध्ये शनिवारी (ता. १५) सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला.

निंब्रळ येथे वीज पडून चार शेळ्या दगावल्या. निंब्रळ येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास उमाजी खंडू पथवे हे वंडेकर वस्तीजवळ शेळ्या चारत असताना, वीज कोसळून त्यांच्या चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जखमी झाल्या. मागील दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात प्रचंड उष्मा वाढला होता.

उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आजदेखील सकाळपासून प्रचंड उष्मा होता. दुपारी साडेतीन वाजता देवठाण, वीरगाव, गणोरेसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

वीरगावमध्ये अर्धा तास धुवाधार पाऊस कोसळला. या पावसाचा उभ्या पिकांना फटका बसला. शेतात काढून ठेवलेला कांदा व इतर शेतीमाल भिजला आहे. सातत्याने शेतकरी अवकाळी पावसाशी मुकाबला करत आहेत.

शासनाने नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील पोलिस पाटील विठ्ठल यादव आंधळे यांच्या शेतातील राहत्या घराजवळच्या नारळाच्या दोन झाडांवर वीज कोसळल्याची घटना शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. एकाच आठवड्यात आश्‍वी पंचक्रोशीतील ही तिसरी घटना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT