Unseasonal Rains Agrowon
हवामान

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह आज अवकाळी पावसाचा अंदाज

विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी, नागरीकांनी तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर यावे.

Team Agrowon

Parbhani News : भारतीय हवामान विभागाने (Weather Department) आज (ता. १६ ) पर्यंत मराठवाड्यातील परभणी, हिंगोली यासह काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा दिला आहे.

कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी, नागरीकांनी तत्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर यावे.

जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्यावा.

झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे. वीजवाहक वस्तूंपासून दूर राहावे, विजेचे खांब, टेलिफोन खांब, लोखंडी पाइप यापासून दूर राहावे. वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो.

त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालिश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी. विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका.

बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तत्काळ बंद करावा. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. झाडाखाली आश्रय घेऊ नये. दोन चाकी, सायकल यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT