Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : राज्यात अपेक्षित थंडी नाहीच; काही भागात तापमान वाढल्याने उन्हाचा चटकाही वाढला

Winter Weather Forecast : पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात यंदाच्या हंगामात गारठा तुलनेत कमीच दिसत आहे. यंदा काही दिवसच कडाक्याची थंडी जाणवली. ढगाळ हवामान आणि पावसामुळे थंडी कमी होण्यास मदत झाली. यंदा आतापर्यंत थंडीच्या लाटाही कमीच आहेत. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तर भारतातही थंडीचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कालच्या तुलनेत आज अनेक भागात तापमानात वाढ दिसून आली. आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कालच्या तुलनेत देशातील निच्चांकी तापमान ३.२ अंशाने जास्त होते. 

आग्नेय अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. उत्तर भारतात ११५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. पश्‍चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी अधिक होत आहे. त्याचा परिणाम राज्यात थंडीवर देखील होत आहे.

उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह कमी जास्त होत असल्याने आणि ढगाळ हवामानामुळे राज्यात तापमान वाढले आहे. अनेक भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली आहे.

किमान तापमानात वाढ झाली झाल्याने काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील बहुतांशी ठिकाणी तापमान ११ अंशाच्या पुढेच दिसून आले. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील. थंडी देखील कमी जास्त होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Banana Cultivation: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंदांच्या मागणीत वाढ

Khandesh Tur Lagwad: खानदेशात यंदा तूर लागवड स्थिर राहण्याचे संकेत

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

SCROLL FOR NEXT