Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. १५) उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. यातच वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यालागत समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, सिधी, रांची ते दक्षिण पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे.

सोमवारी (ता. १४) राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली. यातच पावसाची उघडीप असलेल्या भागात कमाल तापमानाचा पारा तिशीपार असून, जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश तापमान नोंदले गेले.

आज (ता. १५) नंदूरबार, धुळे, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. १४) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.२---२२.४

अहिल्यानगर---३०.०---२१.५

‎‎धुळे---३३.०---२१.४

जळगाव---३१.४---२४.०

जेऊर---३४.५---१९.५

‎‎कोल्हापूर---२७.३---२२.६

‎महाबळेश्वर---१९.५---१७.८

मालेगाव---३१.२---२२.२

‎‎नाशिक---२८.०---२१.८

‎निफाड---२९.०---२१.८

‎सांगली---२९.४---२२.७

‎सातारा---२७.७---२१.९

‎सोलापूर---३३.४---२३.५

‎सांताक्रूझ---३०.८---२५.८

डहाणू---३१.८---२४.०

‎रत्नागिरी---२९.०---२५.४

‎छत्रपती संभाजीनगर---२९.८---२२.८

‎धाराशिव---३१.५---२१.६

‎परभणी---३२.४---२४.०

परभणी (कृषी)---३२.४---२४.०

‎‎अकोला---३२.६---२५.१

अमरावती---३०.६---२३.१

‎भंडारा---३२.०---२५.०‎‎

बुलडाणा---२९.६---२२.६

‎ब्रह्मपुरी---३४.४---२६.६

‎चंद्रपूर---३४.४---२४.८

‎गडचिरोली---३२.६---२४.०

‎गोंदिया---३२.९---२५.४

‎नागपूर---३३.६---२५.६

‎वर्धा---३३.०---२५.५

‎वाशीम---३१.०---२२.६

‎यवतमाळ---३१.४---२४.०

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नागपूर, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT