Rain Forecast Agrowon
हवामान

Vidharbha Weather : पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा कायम असून, धुक्याची चादर, दव पडल्याचे चित्र कायम येत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २९) पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आकाश निरभ्र झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असल्याने, उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा असल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, जळगाव, अकोला येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर डहाणू, अमरावती, सांताक्रूझ, रत्नागिरी, पुणे, वर्धा येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.० (१८.८), अहिल्यानगर ३२ (१७.५), जळगाव ३५.५ (१८), कोल्हापूर ३१.४ (२१.३), महाबळेश्वर ३०.४ (१६), मालेगाव ३१.६ (२१), नाशिक ३२.९ (१७.९), निफाड ३३.२ (१६.५), सांगली ३२.९ (२०), सातारा ३२.७ (१७.३), सोलापूर ३५.८ (१९.९), सांताक्रूझ ३४ (२४), डहाणू ३४.४ (२३.४), रत्नागिरी ३४ (२४.६), छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१९.८), बीड ३२.१ (-), धाराशिव ३२.२ (१८.४), परभणी ३३.९ (१९.३), अकोला ३५.४ (२०.३), अमरावती ३४.४ (१९.१), भंडारा ३० (२२.६), बुलडाणा ३०.८ (२०.५), ब्रह्मपुरी ३५.२ (२३.५), चंद्रपूर ३३ (२०.६), गडचिरोली ३१.४ (२०.४), गोंदिया ३२.६ (२१), नागपूर ३३.४ (२०.८), वर्धा ३४ (२०.८), वाशीम ३३.८ (-), यवतमाळ ३३ (१८.५).

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव.

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे

सोलापूर ३५.८, ब्रह्मपुरी ३५.२, जळगाव ३५.५, अकोला ३५.४, डहाणू ३४.४, अमरावती ३४.४, सांताक्रूझ ३४, रत्नागिरी ३४, पुणे ३४, वर्धा ३४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT